MSEDCL Whatsapp 
सोलापूर

महावितरणने केले "इतके' हजार व्हॉट्‌सऍप ग्रुप; साधणार वीज ग्राहकांशी संवाद !

संतोष सिरसट

सोलापूर  ः ग्राहक संवादासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणकडून पुणे प्रादेशिक विभागात पहिल्या टप्प्यात व्हॉट्‌सऍप ग्रुपचे सुमारे सात हजार 350 ग्रुप तयार केले आहेत. त्याद्वारे सुमारे 18 लाख 37 हजार वीज ग्राहकांशी नियमित संवाद साधण्यात येणार आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार 55 ग्रुपद्वारे सुमारे दोन लाख 63 हजार वीज ग्राहकांचा समावेश करण्यात येणार आहे. 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांच्या संपर्कात राहून थेट प्रादेशिक संचालक ते जनमित्रांकडून नियमित ग्राहक संवाद साधण्यासाठी, अडीअडचणींचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी महसूलनिहाय प्रत्येकी साधारणपणे 250 वीज ग्राहकांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. पुणे प्रादेशिक विभागातील महत्त्वाच्या व मोठ्या वीज ग्राहकांसाठी प्रादेशिक विभाग स्तरावर प्रादेशिक संचालक, परिमंडल स्तरावर मुख्य अभियंता यांच्याकडून व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे संवाद साधण्यात येणार आहे. यासह अधीक्षक अभियंता ते शाखा अभियंते हे सर्व कार्यालयप्रमुख तसेच शहरी व ग्रामीण भागातील जनमित्रांपर्यंत प्रत्येकी एक ग्रुप तयार करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात एका मंडल कार्यालयासह पाच विभाग, 24 उपविभाग आणि 128 शाखा कार्यालये आहेत. यासोबतच प्रत्येक जनमित्रापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांचे ग्रुप तयार करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे सुमारे एक हजार 55 ग्रुपच्या माध्यमातून दोन लाख 63 हजार वीज ग्राहकांशी संवाद साधण्यात येणार आहे. 

व्हॉट्‌सऍप ग्रुपमधील वीज ग्राहकांमध्ये उच्चदाब औद्योगिक ग्राहकांसह सर्व वर्गवारीतील ग्राहक, लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण सहकारी संस्थांचे पदाधिकारी, वाणिज्यिक संकुल पदाधिकारी, महत्त्वाचे ग्राहक, लघुउद्योजक संघटना प्रतिनिधी, औद्योगिक वसाहत संघटना पदाधिकारी, एमआयडीसी वाहिन्यांवरील ग्राहकांचा समावेश राहील. तर प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनमित्रांकडून तयार करण्यात येणाऱ्या ग्रुपमध्ये इतर ग्राहकांसोबतच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, वाड्या-वस्त्यांमधील काही ग्राहकांचा देखील समावेश करण्यात येत आहे. यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक हे देखील ग्रुप ऍडमिन होऊ शकणार आहेत. याव्यतिरिक्त इतर ग्राहकांना व्हॉट्‌सऍप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेण्याची व आवश्‍यकतेनुसार एकापेक्षा अधिक ग्रुप तयार करण्याची मुभा संबंधित अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. 

या ग्रुपद्वारे विविध वीजपुरवठा बंद असल्याचे कारण व सुरू होण्याचा संभाव्य कालावधी तसेच महावितरणच्या विविध ग्राहकसेवांची व वीज सुरक्षेबाबतची नियमितपणे माहिती दिली जाईल. सोबतच ग्रुपमधील सदस्यांकडून प्राप्त धोकादायक वीज यंत्रणेची माहिती तसेच इतर विविध तक्रारींचे तत्परतेने निवारण करण्यात येईल. तथापि या ग्रुपमध्ये समाविष्ट केलेल्या वीज ग्राहकांनी केवळ महावितरणशी संबंधित माहिती, तक्रारी किंवा सूचना करण्याचे आवाहन केले आहे. अन्य कोणत्याही प्रकारचे मेसेज किंवा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या ग्राहकास संबंधित व्हॉटसऍप ग्रुॅपमधून वगळण्यात येईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT