Mahesh Kothe esakal
सोलापूर

महेश कोठे म्हणाले, नगरसेवकच कॉन्ट्रॅक्टर झाल्याने वाढला भ्रष्टाचार

तात्या लांडगे

महेश कोठे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने साडेचार वर्ष सोलापूर महापालिकेत एक हाती सत्ता भोगली.

सोलापूर: भारतीय जनता पार्टीने साडेचार वर्ष सोलापूर महापालिकेत एक हाती सत्ता भोगली. मात्र शहराचा विकास किती झाला त्यांनी दाखवून द्यावे, त्यांचे नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झाल्याने भ्रष्टाचार वाढला आहे, असा हल्लाबोल महेश कोठे यांनी केला.

सोलापूर शहरात महापालिकेच्या अखत्यारीत येणारे अंतर्गत रस्त्यावरील 'खड्डे बुजवा' अभियान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांच्या पुढाकारातून अभियानाचे उद्घाटन नवीन आरटीओ कार्यालय परिसरातील मुख्य रस्त्यावर झाले. उद्घाटन प्रसंगी महापौर महेश कोठे, शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, महिला अध्यक्ष तथा नगरसेविका सुनीता रोटे, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुहास कदम, माजी नगरसेविका सुनंदा साळुंखे, युवकचे प्रशांत बाबर, प्रांतिक सदस्य महेश निकम्बे, महिला आघाडीच्या मनीषा नलावडे, उपाध्यक्ष राम साठे, सेवादल अध्यक्ष चंद्रकांत पवार, विजय बाहेती, कय्युम शेख, बंडू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महेश कोठे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने साडेचार वर्ष सोलापूर महापालिकेत एक हाती सत्ता भोगली. मात्र शहराचा विकास किती झाला त्यांनी दाखवून द्यावे, त्यांचे नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झाल्याने भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात पाहिलं तर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. दोन देशमुख मंत्री असतानाही शहराची अवस्था विकासाऐवजी भकास झाली, अशा या नाकर्ते भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत घरी बसवा, त्यासाठी वेळप्रसंगी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणुका लढवू. शहराध्यक्ष जाधव म्हणाले, शहरात मूलभूत सुविधा होत नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यामुळे बरेच अपघात झाले आहेत, नागरिक त्रस्त आहेत, म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने खड्डे बुजवायचं काम हाती घेतले आहे. मोठे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला भाग पाडू.

सोलापूर नव्हे 'खड्डेपूर'

विद्या लोलगे म्हणाल्या, शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे, खड्ड्यामध्ये पडल्याने अपघात वाढले, दुर्घटना वाढल्या, मणक्याचे आजार वाढले आहेत. मात्र, महापालिका या समस्येकडे दुर्लक्ष करते आहे. त्याचा विचार करून आम्ही 'खड्डे बुजवा' अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक प्रभागात हे अभियान राबवणार असून नागरिकांनी आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन लोलगे यांनी केले.

सुनीता रोटे म्हणाल्या, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, शहराची अवस्था पाहिली तर बिकट आहे. सोलापूर नव्हे 'खड्डेपूर' अशी चर्चा असून त्याला महापालिकेतील भाजप सत्ताधारी कारणीभूत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT