mahesh lokhande wrote letter of blood to fadnavis Sakal
सोलापूर

मोहिते-पाटील समर्थकाचे फडणवीसांना रक्ताने पत्र; धैर्यशील मोहिते-पाटील यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी

धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथील महेश लोखंडे या मोहिते- पाटील समर्थक कार्यकर्त्याने थेट देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहीत, धैर्यशील मोहिते- पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. लोखंडे यांचे हे पत्र समाज माध्यमात प्रचंड व्हायरल झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथील महेश लोखंडे या मोहिते- पाटील समर्थक कार्यकर्त्याने थेट देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहीत, धैर्यशील मोहिते- पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. लोखंडे यांचे हे पत्र समाज माध्यमात प्रचंड व्हायरल झाले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी धैर्यशील मोहिते- पाटील हे तीव्र इच्छुक आहेत. त्यांनी मागील वर्षभरापासून मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारी केलेली आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र, भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, त्यामुळे मोहिते- पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. त्यातून त्यांनी बंडाची तयारी चालवली आहे.

आता मोहिते- पाटील यांच्यावर त्यांच्या समर्थकांकडून शरद पवार यांच्या ‘तुतारी’ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवावी, असा दबाव वाढत आहे. मात्र, मोहिते- पाटील निर्णय घेत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे धैर्यशील मोहिते- पाटील हे मतदारसंघात फिरत असताना दुसरीकडे भाजपकडूनही मोहिते- पाटील यांना वगळून माढा लोकसभा मतदारसंघासाठी बैठका होत आहेत. त्यामुळे मोहिते- पाटील समर्थकही कामाला लागले आहेत.

पत्राची दखल, की केराची टोपली?

दरम्यान, धोंडेवाडी येथील महेश लोखंडे या तरुणाने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते- पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. रक्ताने लिहिलेल्या या पत्राची देवेंद्र फडणवीस दखल घेणार, की केराची टोपली दाखवणार? याकडेच मोहिते- पाटील समर्थकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT