Mallikarjun, who is investigating the corona swab postponed the marriage for duty 
सोलापूर

कोरोना संपुष्टात आणूनच लग्न करण्याचा निर्धार; स्वॅब तपासणी करणाऱ्या मल्लिकार्जुन यांनी कर्तव्यासाठी लग्न ढकलले पुढे...

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : जेऊर (ता. अक्कलकोट) येथील मल्लिकार्जुन नीलकंठ झंप्पा हे सोलापुरातील डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजमध्ये मागील दोन महिन्यांपासून कोविड १९ आजाराचे स्वॅब तपासणीचे काम करीत आहे. त्यांचे २४ मे ला लग्न होणार होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि लग्नामुळे स्वॅब तपासणी कामात योगदान देता येणार नाही, असे वाटल्याने त्यांने आपले लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंदगी (जि. विजयपूर) येथील श्रुती कडकोळ यांच्याशी मल्लिकार्जुन यांचे जमलेले नियोजित लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अगोदर सोलापूरला सुरू असलेला गंभीर आजार पूर्णपणे घालवून दिवाळीनंतर लग्न करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागात मागील सहा वर्षांपासून प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे काम करणारे मल्लिकार्जुन हा  २७ मार्चपासून सोलापुरात डॉ. व्ही. एम मेडिकल कॉलेज (व्हीआरडीएल) येथे कोरोना आजाराचे स्वॅब तपासणी केंद्र सुरू झाल्यापासून सेवेत रुजू झाला आहे. तेथे तो थ्रोट आणि नोझल स्वॅब तपासणीचे काम करीत आहे. त्यास आवश्यक ते पीपीई किट व इतर सुरक्षा वापरून आता दररोज स्वॅब तपासणी करत असल्यांचे त्यांनी सांगितले. पेशंटचे नमुने तपासणीसाठी आल्यानंतर त्याची काळजीपूर्वक तपासणी करण्याचे काम ते करीत आहे. दरम्यानच्या काळात त्यांचे पूर्वीच ठरलेले लग्न कोरोना काळात अडथळा येईल असे वाटल्याने ते दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला वा आपल्या कर्तव्यला महत्त्व दिले आहे. स्वतःच्या लग्नापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून त्याने  कुटुंबियांबरोबर चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT