कोव्हिड वॉर रूम
कोव्हिड वॉर रूम Canva
सोलापूर

माळशिरस पंचायत समितीची व्यूहरचना ! केली "ग्राम कोव्हिड वॉर रूम'ची निर्मिती !

अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील (Malshiras Taluka) कोरोनाचा (Covid-19) वाढता प्रादुर्भाव, नागरिकांमध्ये पसरलेले भीतीचे वातावरण, वैद्यकीय सुविधांची कमतरता, शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव, वाढते रुग्ण मृत्यू यावर मात करण्यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रतिबंधात्मक व आरोग्य सुविधा सुलभीकरणाचा उपक्रम (Corona preventive and health facility facilitation) सुरू करण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक गावामध्ये "ग्राम कोव्हिड वॉर रूम'ची (Village Covid War Room) निर्मिती केली आहे. (Malshiras Panchayat Samiti constructed Village Covid War Room)

वॉर रूममधून वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत, ग्राम समिती, सीएचओ उपकेंद्र यांच्याशी समन्वय ठेवून संक्रमित रुग्णांना औषधोपचार मिळावा यासाठी पंचायत समिती येथे नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. सभापती शोभा साठे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते- पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकार घेत आहे.

पंचायत समितीच्या सभापती शोभा साठे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते- पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, नोडल अधिकारी डॉ. खडतरे, कक्ष अधिकारी कदम, पुणे टेक्‍निकलचे अजय राऊत, विस्तार अधिकार आदींची टीम यासाठी परिश्रम घेत आहे.

सुलभीकरण संकल्पना

गृह व संस्थात्मक विलगीकरणातील रुग्णांना जागेवरच औषधोपचार पुरविणे, संक्रमित रुग्णांना धीर देणे, ताण- तणावमुक्त राहण्यासाठी प्रोत्साहित करणे, समुपदेशन करणे, मर्यादित आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करणे, तपासणी व विलगीकरण व्यवस्था सुलभ करणे, गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा गावात व नजीक मिळण्यासाठी उपाययोजना करणे, लसीकरणात सुसूत्रता आणणे.

कोविड वॉर रूम शिक्षक समन्वयकाची जबाबदारी

यंत्रणेच्या मदतीने गावातील संक्रमित रुग्णांची माहिती, विलगीकरण सोय, सद्य:स्थितीत उपचार, संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती फोनद्वारे संकलित करून त्यांना आवश्‍यकतेनुसार घरीच किंवा विलगीकरणाच्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्राचे डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी व आशा यांच्या माध्यमातून औषध उपचार पोचवणे, समुपदेशन करणे.

टेलिमेडिसीन प्रणाली

संक्रमित रुग्णांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून रुग्णांना अत्यवस्थ होण्यापासून वाचविण्यासाठी कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना टेलिमेडिसीन प्रणालीद्वारे औषधोपचार पुरवला जाणार आहे. घरीच व संस्थात्मक विलगीकरणातील रुग्णांना टेलिमेडिसीनद्वारे औषध पुरवण्याची महाराष्ट्रातील ही अभिनव संकल्पना आहे. सर्व वॉर रूमवर नियंत्रण व समन्वय तालुका नोडल अधिकारी कक्षामार्फत केले जाणार आहे.

कोव्हिड सुलभीकरण या पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या संयुक्त उपक्रमातून कोरोनावर मात करणे व सर्वसामान्यांना उपचार मिळणे शक्‍य होणार असून, गाव पातळीवरील आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.

- अर्जुनसिंह मोहिते- पाटील, माजी उपसभापती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

SCROLL FOR NEXT