Bullock cart race 
सोलापूर

"यांना' नडला बैलगाडी शर्यतीचा शौक; दहाजणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

माळशिरस (सोलापूर) : कोरोना विषाणूची टांगती तलवार डोक्‍यावर लटकत असताना तरंगफळ (ता. माळशिरस) येथील सिताडीच्या डोंगरात काही शौकिनांनी चोरून बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्ही. बी. गोल्डे यांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी प्रसंगावधान राखून शर्यतीच्या ठिकाणी धाव घेतली व शर्यत रोखली. या दहा शौकिनांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

देशावर व राज्यातील सर्व जिल्ह्यांवर कोरोना विषाणूचे संकट घोंगावत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी स्वयंशिस्त पाळत प्रशासनाने दिलेल्या नियमांच्या अधीन राहणे गरजेचे आहे. मात्र केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीला बंदी घातली असताना, काहींनी तरंगफळ येथील सिताडीच्या डोंगरात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून कोरोना संकटात भर घालण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके, पोलिस हेड कॉन्स्टेबल अभिजित कुंभार, पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष भोसले, पोलिस नाईक प्रणय शिंदे, प्रवीण काळे, सुभाष पावरा यांच्या सहकार्याने ही शर्यत रोखण्यात आली. 

शर्यतीच्या ठिकाणी पाच लाख रुपये किमतीचा पिकअप (एमएच 45 - एएफ 3064), 50 हजार रुपये किमतीचा शर्यतीचा एक बैल, चार हजार रुपये किमतीचे शर्यतीचे दोन बैल असा एकूण पाच लाख 54 हजारांचे शर्यतीचे साहित्य पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच बैलगाडी शर्यतीला केंद्र सरकारची परवानगी नसतानाही माळशिरस परिसरातील 8 ते 10 व्यक्तींनी बैलगाडी मालकाकडून पैसे स्वीकारून शासन निर्णयाचा भंग केला. कोरोनाचे संकट समोर असतानाही बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी माळशिरस येथील पोलिस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Corporation Protest: जंतर-मंतर आंदोलनाचे महापालिकेत पडसाद; सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी

Harmony Park: संगीताच्या सुरांमध्ये योगा आणि खेळ, ५० रुपयांच्या तिकिटात स्वप्नवत सफर! ३०० टन भंगारातून साकारल्या कलाकृती

Latest Marathi News Live Update : CJP चे सौरव दास आणि रांका चर्चेसाठी रवाना; थोड्याच वेळात सरकारसोबत बैठक, तोडगा निघणार?

सुबोध भावेने साकारली गोंदवलेकर महाराजांची भूमिका, अभिनेत्याबद्दल अनुभव सांगताना अर्थव सुदामे म्हणाला... 'त्यांनी पैसे...'

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

SCROLL FOR NEXT