In Malshiras taluka 14 corona patient died in two weeks
In Malshiras taluka 14 corona patient died in two weeks 
सोलापूर

माळशिरस तालुक्‍यात पुन्हा कोरोनाचा कहर; दोन आठवड्यात तब्बल 14 जणांचा मृत्यू 

मिलिंद गिरमे

लवंग (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्याही गतीने वाढत चालली आहे. दोन आठवड्यातच 14 जणांचा कोरोनामुळ मृत्यू झाल्याने कोरोनाची दुसरी लाट पसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणा टेस्टिंगसाठी तत्पर असलीतरी पूर्वीप्रमाणे टेस्टिंगसाठी लोक येत नसल्याने अदृश्‍य कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समजून लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला आहे. विशेषत: तरुण पिढी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे समजून नियमाची पायमल्ली करत असल्याचे ठिकठिकाणी आढळून येत आहे. माळशिरस तालुक्‍यात 14 नोव्हेंबरला पाच हजार 372 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यादिवशी माळशिरस तालुक्‍यात 328 रूग्ण उपचार घेत होते. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी दोन आठवड्यातच चौदा रुग्णांचा मृत्यू होऊन सध्या 416 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 133 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

तालुक्‍याचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी सकाळशी बोलताना सांगितले, की कोरोना वाढीचा वेग मंदावला असला तरी जे रुग्ण येत आहेत ते कोरोनाने गंभीर स्वरूप धारण केल्यावर पुढे येत आहेत. काही रुग्णाचा मृत्यूही होत आहे. आरोग्य विभागामार्फत दैनंदिन टेस्टिंग कॅम्पचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु, कॅम्पला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. रुग्ण स्वतःहून टेस्ट करण्यास पुढे येत नाही. जेव्हा त्रास सुरू होईल तेव्हाच रूग्ण पुढे येत आहेत. आत्तापर्यंत माळशिरस तालुक्‍याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के व मृत्यूदर 2.09 टक्के एवढा आहे. खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांनी आपणाकडे येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची तसेच आपणाकडे ऍडमिट असलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करून घ्यावी. यासाठी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याशी संपर्क साधावा व कोरोना चाचणी करून रुग्णावर योग्य ते उपचार घडवून आणावेत. चाचणी न करता उपचार सुरू ठेवल्यास रुग्ण गंभीर होऊन त्याच्यावर पुढील उपचार करणे अवघड होत आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT