Malshiras Vidhan Sabha sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : माळशिरसच्या निवडणुकीत मोहिते-पाटलांची प्रतिष्ठा पणाला

Malshiras Vidhan Sabha Election 2024 : उत्तम जानकर अन् राम सातपुतेंच्या लढतीकडे जिल्ह्यावासीयांचे लागले लक्ष

सकाळ वृत्तसेवा

सुनील राऊत : सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदार संघांपैकी माळशिरस विधानसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. मोहिते-पाटलांचे वर्चस्व असलेल्या माळशिरसच्या यंदाच्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचे एकूण १२ उमेदवार उभा आहेत. मात्र खरी लढत ही उत्तम जानकर अन् राम सातपुते यांच्यातच असल्याने सर्वांचे लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे.

दोन उमेदवारांशिवाय बहुजन समाज पक्षाचे सूरज सरतापे, वंचित बहुजन आघाडीचे राज यशवंत कुमार, राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ. सुनील लोखंडे, अपक्ष उमेदवार अरुण धाईजे, कुमार लोंढे, दादा लोखंडे, मनोज कुमार सुरवसे, रमेश नामदास, सुधीर पोळ, त्रिभुवन धाईजे, यांचा प्रचार तुरळक दिसून येतो.

राज्याची स्थापना झाल्यापासून मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील विरोधक म्हणजेच तालुक्यातील धनगर समाज हे अलिखित ठरलेले आहे. या पूर्वी राजकीय पक्ष नावाला असत परंतु या विधानसभा निवडणुकीत हे दोन पारंपारिक विरोधक एकत्र आले असून या दोघांच्या विरोधात विद्यमान आमदार राम सातपुते हे लढा देत आहेत.

मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून भाजपला उमेदवार मिळणार का? असे वातावरण तयार झाले होते परंतु विकास कामाच्या जोरावर युवकांमध्ये वेगळी क्रेझ असल्यामुळे विद्यमान आमदार राम सातपुते यांना भारतीय जनता पक्षाने विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सातपुते यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील परिवारातील चाणक्य समजले जाणारे जयसिंह ऊर्फ बाळ दादा मोहिते-पाटील हे एक लाखाच्या पुढील मताने जानकर विजय होणार अशी ग्वाही देत होते.

मात्र चिन्ह वाटपानंतर मागील पंधरा दिवसांपासून प्रचारातील वातावरण पाहता ही निवडणूक चुरशीची होणार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर हे आपल्या सहकाऱ्यांसह पूर्ण ताकदीनिशी प्रचार करीत आहेत.

त्यांना मोहिते-पाटील परिवारातील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी उपसभापती अजुर्नसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी, मोहिते पाटील हे गावोगावी प्रचारात आहेत. तर भाजप उमेदवार राम सातपुते व त्यांच्या पत्नी संस्कृती हे आपल्या सहकाऱ्यांसह प्रत्येक गावाला भेट देऊन आपल्या विकास कामावर बोलत आहे.

दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून मतपेटीत कसे रूपांतर होते यावर निकाल अवलंबून असणार आहे. दोन्ही उमेदवारांनी जाहीर सभांवर भर दिलेला दिसून येतो. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खासदार अमोल कोल्हे तर भाजपतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. त्याशिवाय होम टू होम प्रचाराचा धडाका सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक बाबी

  • आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपचे सदस्य आहेत तरीही ते कोणाच्याही मंचावर दिसून आलेले नाहीत.

  • उर्वरित सर्व मोहिते-पाटील परिवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय.

  • दोघांपैकी विजयी कोणीही झाला तरी राजकीयदृष्ट्या मोहिते-पाटलांना आपल्या गटाची नव्याने बांधणी करावी लागणार.

  • सोशल मीडियामुळे मतदार सतर्क.

  • उत्तमराव जानकरांना यंदा मोहिते-पाटलांचा पाठिंबा आहे.

  • राम सातपुते यांनी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला ते विकास कामावर बोलत आहेत.

  • या निवडणूक प्रचारात कधी नव्हे ते एमआयडीसी उभारणीचे आश्वासन दोन्ही उमेदवारांकडून दिले जात आहे.

माळशिरसमधील मतदारांची संख्या

पुरुष १, ८०, ३२२

महिला १, ६९, २१४

इतर ३२

एकूण ३, ४९, ५६८

यापूर्वीच्या निवडणुकीतील उमेदवार २०१९

राम सातपुते (भाजप ) १,०३,५०७

उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी काँग्रेस) १,००,९१७.

राज यशवंत कुमार (वंचित बहुजन पार्टी) ५५३८.

२०१४

  • हनुमंत डोळस (राष्ट्रवादी काँग्रेस) ७७,१७९.

  • अनंत खंडागळे (अपक्ष) ७०,९३४

  • लक्ष्मण सरवदे (शिवसेना) २३,५३७.

२००९ (राखीव)

  • हनुमंत डोळस (राष्ट्रवादी काँग्रेस) ८२,३६०

  • उत्तमराव जानकर (अपक्ष ) ६६,१३४.

  • दिलीप कांबळे (भाजप) ५८७५.

    #ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT