सोलापूर

पत्नीच्या विरहाने त्याने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

माळशिरस ः येथील शहा धारसी जीवन प्लॉटमध्ये राहणाऱ्या संजय लक्ष्मण ओहोळ (वय 44) याने जीवनाला कंटाळून पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 
संजय विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. तो पदवीधर होता, परंतु त्याला कुठेही नोकरी मिळत नव्हती. नोकरी नसल्यामुळे त्याचे व त्याच्या पत्नीचे वारंवार प्रापंचिक वाद होत असत. अशातच आठ-दहा दिवसांपूर्वी पत्नी भावाकडे पुण्याला गेली. ती परत येईना. संजयला पत्नीचा विरह सहन होईना. त्यातच शनिवारी (ता. 25) तो बेडरूममध्ये एकटाच असल्याने आत्महत्या करण्यास संधी मिळाली. दुपारी चार ते पाचच्या दरम्यान माळशिरस ते अकलूज रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. त्याच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगी, एक भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.  

मैत्रिणीने चोरी केल्याची फिर्याद 
सांगोला : उसने पैसे मागण्यासाठी आलेल्या मैत्रिणीनेच घरातील 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल व तीन हजार रुपये चोरून नेल्याची घटना सांगोल्यात घडली आहे. याबाबत सुगंधा विकास भजनावळे (वय 24, रा. मिरज रोड, शिवाजीनगर, सांगोला) हिने आपली मैत्रीण काजल सखाराम बनसोडे (रा. भीमनगर, ता. सांगोला) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबत हकीकत अशी की, सुगंधा भजनावळे येथे राहण्यास असून श्री हॉस्पिटलमध्ये नर्सची खासगी नोकरी करते. 22 जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास सुगंधाची मैत्रीण काजल बनसोडे ही उसनवार पैसे मागण्यासाठी आली होती. या वेळी सुगंधाने सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. मी माझ्या भावास पैशाबाबत विचारून तुला कळवते, असे सांगितले. या वेळीच सुगंधाच्या घराबाहेर नळाला पाणी आल्याने ती पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडली. परंतु सुगंधाची मैत्रीण घरातच बसून होती. या वेळी घरातील भांड्याच्या रॅकवर ठेवलेला 12 हजार रुपये विवो कंपनीचा मोबाईल व पॉकेटमध्ये ठेवलेले तीन हजार रुपये मैत्रिणीनेच घरातून गुपचूप माझ्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून घेऊन निघून गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस तपास करीत आहेत.

महाराष्ट्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT