man beaten by five people motorcycle rally from village case registered solapur crime  esakal
सोलापूर

Solapur Crime : गावातून मोटरसायकल रॅली का काढली या कारणावरून एकास 5 जणांनी चाकू व काठ्यानी केली मारहाण, गुन्हा दाखल

पाच जणाविरोधात मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल

राजकुमार शहा

मोहोळ : गावात काँग्रेस पक्षाची रॅली का काढली या कारणावरून एकाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना मोहोळ ते अर्जुनसोंड रस्त्यावर गुरूवार ता 21रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी पाच जणाविरोधात मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीसाकडुन मिळालेल्या माहीती नुसार, गुरूवार ता.21 रोजी रात्री 8.30 वाजता सुरेश प्रभाकर हावळे रा अर्जुनसोंड हा मोहोळ येथुन महालक्ष्मीच्या सणासाठी किराणा बाजार घेऊन घराकडे जात होता.

मोहोळ ते अर्जुनसोंड रस्त्यावरील एका लॉजच्या थोड्या पुढे नवरा-नवरीचे मंदिर आहे. त्या ठिकाणाहुन जात असताना अर्जुनसोंड येथे राहणारे युवराज परशुराम ढेरे, बनाजी शिवराम ढेरे, बाबु अंबादास ढेरे, शिवराम विठोबा ढेरे, गोरख बालभीम ढेरे सर्व रा अर्जुनसोंड (शिवाजी नगर) हे सर्वजण माझ्या जवळ आले, व तु गावात राजकारण करू लागलास काय ?

पंधरा दिवसापूर्वी गावात काँग्रेस पक्षाची रॅली का काढली ? तुला खुप मस्ती आली आहे काय, आता तुला दाखवितो म्हणून शिवीगाळ करू लागले त्यावेळी युवराज, बाबु व गोरख यांच्या हातात काठ्या होत्या व धनाजी याचे हातात चाकु होता.

त्यावेळी ते माझ्या पाठीवर मारू लागले, मी आरडा ओरड करू लागलो त्यावेळी धनाजी याने त्याच्या हातातील चाकुने माझ्या डाव्या डोळ्या जवळ कपाळावर चाकुने वार केले त्यामुळे जखम झाली आहे. मारहाणीत काठीचा मार डोक्याच्या मागील बाजूस लागल्यानेही जखम झाली आहे.

वरील सर्वजण मारहाण करीत असताना शिवराम विठोबा ढेरे हा आज याला मारा, खलास करा, सोडू नका असे म्हणुन मारहाण करणाऱ्यांना चिथावणी देत होता. पंधरा दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाची गावात रॅली काढली होती त्याचा राग मनात धरून वरील पाच जणांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी सुरेश प्रभाकर हावळे रा अर्जुनसोंड याने मोहोळ पोलिसात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT