Sharad Pawar sakal
सोलापूर

Sharad Pawar : काळुंगे पती-पत्नीने हजारोचे संसार उभे करण्याचे केले काम

शिक्षणाबरोबर अर्थकारणात काळुंगे पती-पत्नीने सहकारी संस्थाची उभारणी करून हजारोचे संसार उभा करण्याचे काम केल्याचे गौरवोउद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - शिक्षणाबरोबर अर्थकारणात काळुंगे पती-पत्नीने सहकारी संस्थाची उभारणी करून हजारोचे संसार उभा करण्याचे काम केल्याचे गौरवोउद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी, धनश्री मल्टीस्टेटच्या तपपुर्ती, व संस्थापक शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माञी मंत्री सुशीलकुमार शिंदे हे होते.

व्यासपीठावर साहित्यिक आ. ह. साळुंखे, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील, सिध्दाराम म्हेत्रे,लक्ष्मण ढोबळे, राजन पाटील, विश्वनाथ चाकोते, धनजंय साठे, वैभव नाईकवाडी, अभिजित पाटील, भगीरथ भालके, चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, राहूल शहा, धनश्रीचे शिवाजीराव काळुंगे, धनश्रीच्या अध्यक्षा शोभा काळुंगे, ह.भ.प. जयवंत बोधले महाराज, दामाजीचे शिवानंद पाटील, अॅड. सुजित कदम, जकाराया शुगरचे बिराप्पा जाधव आदीसह मान्यवर उपस्थित होते.

अर्थवेल या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवराचे हस्ते करण्यात आली. यावेळी बोलताना खा. पवार म्हणाले की, या परिसराला दुष्काळाची झळा कायम असताना देखील अतिशय खडतर परिस्थितीत शेती, पाणी, शिक्षण, सहकार आणि समाज उभारण्यासाठी पती-पत्नीने आपले आयुष्य झोकून देण्याची भूमिका पार पाडली.

त्यातून अनेक संस्थाची उभारणी देखील केली असून माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी देखील त्यांनी चोखपणे पार पाडली. शिवाजीराव काळुंगे यांनी प्रेम विवाह केल्याची चिंता सुशीलकुमार शिंदे यांना का? असा सवाल उपस्थित केल्यानंतर उपस्थित जोरदार हसा उमटला.

माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, हाडाच्या शिक्षकी पेशातून काळुंगे परिवारांने एवढा मोठा आर्थिक संस्थेचा डोलारा उभा करताना नवा समाज घडविण्याचे काम केले. आर्थिक संस्था चांगल्या चालवून दाखवल्या. यावेळी हर्षवर्धन पाटील, जयवंत बोधले, अभिजीत पाटील, यांची भाषणे झाले.

प्रास्ताविक सिताराम महाराज कारखान्याच्या सिओ राजलक्ष्मी गायकवाड-काळुंगे यांनी केले. सुत्रसंचालन इंद्रजित घुले व श्वेता हुल्ले यांनी केले. तर आभार गौरव समितीचे प्रमुख शिवानंद पाटील यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

CIBIL Score: तुमचा CIBIL आताच सुधारा, जर तुमचा सिबिल खराब असेल तर नोकरीही मिळणार नाही

Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Rain-Maharashtra Latest Live News Update: गेल्या २४ तासांत घाट क्षेत्र आणि उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

Sickle Cell Patients in Crisis: सिकलसेल रुग्ण संकटात; डागा रुग्णालयात हायड्रॉक्सीयुरियाचा तुटवडा, उपचाराऐवजी रुग्णांना दाराबाहेर

SCROLL FOR NEXT