सोलापूर

मंगळवेढ्याला आंदोलनाचा वेढा ! कसा तो वाचा... 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : एकमेकांवरील तक्रार अर्जावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर नगराध्यक्ष, नगरसेवक आणि कर्मचारी यांच्यात आंदोलन सुरू असतानाच आता त्यात चौथ्या आंदोलनाची भर पडली असून शहरातील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी राजे प्रतिष्ठानने निदर्शने व धरणे आंदोलन सुरू केले. यामुळे पालिकेत आलेल्या नागरिकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागला. 

प्रजासत्ताक दिनापासून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर नगराध्यक्षा, 13 नगरसेवक आणि कर्मचारी यांची आंदोलने सुरू आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना नगरपालिकेने शहरातील अतिक्रमण न काढता ती अतिक्रमणे कागदोपत्री काढल्याचे दाखविल्यावरून राजे प्रतिष्ठान या संघटनेने निदर्शने व धरणे आंदोलन सुरू केले आहे. यापूर्वी मुख्याधिकारी पल्लवी पाटील या आपल्याला विश्‍वासात न घेता चुकीच्या पद्धतीने कामकाज करत असल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित करून कारवाई करावी, या मागणीसाठी नगराध्यक्षा अरुणा माळी नगरपालिकेच्या उजव्या बाजूला आंदोलनासाठी बसल्या आहेत. तर नगराध्यक्षा चुकीच्या मनमानी पद्धतीने कारभार करतात, त्यांच्या पतीच्या वाढत्या हस्तक्षेपावर व ठेकेदाराच्या बिलावर सही करत नसल्याच्या वादावरून अन्य प्रश्‍नांसंदर्भात कारवाई करावी, या मागणीसाठी 13 नगरसेवकांनी नगरपालिकेच्या डाव्या बाजूला आंदोलन सुरू केले. तर या आंदोलनात भरीस भर म्हणून नगरपालिकेच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी देखील अन्याय व त्रासातून मोकळे करावे, यासाठी थेट मुख्य दरवाजात आंदोलन सुरू केले. 

गेल्या दोन दिवसांतील शासकीय सुटीमुळे आज आठवडा बाजार दिवशी नगरपालिकेत विविध दाखले व इतर कामांसाठी शहर व ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना या आंदोलनांमुळे रिकाम्या हाताने परतावे लागले. सध्या कुरघोडीच्या राजकारणाने शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना प्रजासत्ताक दिनी लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होऊन सर्वसामान्य शहरवासीयांना मात्र वाऱ्यावर सोडल्याची चर्चा शहरात सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT