IPS officer niyomi satam
IPS officer niyomi satam sakal
सोलापूर

Mangalwedha News : मंगळवेढ्याच्या पोलीस स्टेशनचा पदभार आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची नियंत्रण कक्षात बदली झाली असून, त्यांच्या जागी प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक नियोमी साटम यांच्या नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिले. मंगळवेढा पोलीस स्टेशनचा पदभाराचा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे आल्यामुळे अवैध व्यवसायिकाचे धाबे दणाणले.

आयपीएस दर्जाच्या नियोमी साटम या प्रशिक्षणार्थी असून त्यांना 19 जून ते 1 सप्टेंबर पर्यंत मंगळवेढ्यात पोलीस निरीक्षक पदाचा पदभार देण्यात आला. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील मूळच्या असून मुंबई येथे स्थायिक आहेत. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी मंगळवेढ्यात कोरोना काळात बेशिस्त झालेल्या नागरिकांना शिस्त लावण्याबरोबरच तालुक्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास करण्यात पुढाकार घेतला होता.

चोरी प्रकरणातील जप्त केलेल्या मुद्देमाल फिर्यादीला परत केला. हातभट्टी, जुगार अड्डे, गुटखा यावर सातत्याने कारवाया केल्या. तत्कालीन उपभोगीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचा जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे यांनी तपास कार्याबद्दल गौरव केला.

तालुक्यात पडोळकरवाडी खून प्रकरण, बालक अपहरण, वाढत्या चोरीच्या घटना, अवैध व्यवसाय, खोटे गुन्हे आदीवरून पोलीस निरीक्षक माने यांच्या विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आरपीआय च्या पदाधिकाऱ्याने कोल्हापूर येथील पोलीस महानिरीक्षकाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यावेळी 10 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

एका बाजूला राजकीय पदाधिकाऱ्यांची तक्रार तर दुसऱ्या बाजूला अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्या कामाबद्दल सत्कार करण्यात आले. तर आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांचा तक्रारी मागील हेतूवर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी प्रत्त्युत्तर दिले. सध्या मंगळवेढ्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले.

दिवसा होणाऱ्या घरफोड्या त्या गुन्ह्याची उकल यासह अवैध वाळू वाहतूक, कर्नाटक मार्गे होणारी गुटखा वाहतूक इतर अवैध धंदे आदी प्रश्नावर पोलिसांच्या कारवाई नंतर देखील सुरूच राहतात. त्यावर कायमस्वरूपी निर्बंध घालण्याच्या दृष्टीने नव्या पोलीस अधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे. कर्नाटकातून येणाऱ्या राज्यभर अवैध व्यवसायिकासाठी मंगळवेढा हे प्रवेशद्वार असल्यामुळे यापूर्वी अनेक पोलिस अधिकाऱ्यांना याचा फटका बसला. माने यांच्या बदलीचे आदेश झाल्याचे समर्थात मंगळवेढा राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चौकाचौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.

उच्च न्यायालयाने नागरिकांवरील दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यावर चौकशी करून कारवाई का झाली नाही याबाबत पोलीस प्रमुखांना खुलासा मागितल्यानंतर सर्वपक्षीयांनी वाढलेले अवैद्य व्यवसाय सामान्य जनतेशी अधिकाऱ्याची बोलण्याची पद्धत या गोष्टी पोलीस महानिरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर माने यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले.

- प्रतिक किल्लेदार शहराध्यक्ष, शिवसेना

सामान्य माणसात पोलिसा विषयीची प्रतिमा उंचावण्याबरोबर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यावर भर राहील. एस पी दर्जाचे अधिकार असल्यामुळे मी कुणाच्या आदेशाची वाट बघणार नाही सध्या वारीच्या बंदोबस्त असल्याने वारी नंतर आपल्या कामाचा अनुभव लोकांना येईल.

- नियोमी साटम, पोलीस निरीक्षक मंगळवेढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT