Manoj Jarange Patil sakal
सोलापूर

Manoj Jarange Patil : सगळ्या पक्षांसाठी आपल्या बापजाद्यांनी वेळ दिला, पण मराठा आरक्षणावर एकही पक्ष बोलायला तयार नाही

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे -पाटील यांची मंगळवेढ्यात यल्गार सभा आयोजित केली. त्यावेळी ते बोलत होते.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - सगळेच राजकीय पक्ष मोठे करण्यासाठी आपल्या समाजातील बापजाद्यांनी वेळ दिला. सहा महिन्यात सगळे पक्ष सत्तेत येवू गेले. पण आपल्यावर वेळ आल्यावर एकही राजकीय पक्ष आरक्षणावर बोलायला तयार नसल्याची खंत मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे -पाटील यांची मंगळवेढ्यात यल्गार सभा आयोजित केली. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजाच्या मुर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आंतरवाली येथे मराठा आंदोलनात माता माऊली चार चार महिन्याची लेकरे घेवून बसलो असताना अचानक हल्ला करून माता माऊलीचे डोके फोडून चेहरा दिसत नव्हता इतका विद्रुप केला. त्यात 75 वर्षाच्या वयोवृद्धाला सोडले नाही.

लोकशाही पध्दतीने आमचे आंदोलन सुरू असताना हल्ला करण्याचे कारण काय याचे उत्तर सरकारने अद्याप दिले नाही. आमचे आंदोलन मोडण्यासाठी हल्ला घडवून आणला. तो हल्ला महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजावर हल्ला होता.

पाच हजार कागदाचा पुरावा सापडल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजाला सकसकट प्रमाणपत्र द्यावे लागेल. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही. मराठा आणि कुणबी एकच असलेले अनेक पुरावे होते. चर्चेसाठी अनेक मातब्बर नेते पाठविले. त्यांना मराठ्याची पोटजात का होवू शकत नाही, असा प्रश्न विचारताच त्याची बोलती बंद झाली.

सगळे निकष मराठा समाजाचे पार केले. गायकवाड कमीशनने मराठा 12 टक्के मागास असल्याचे सिध्द केले. वंशावळी असलेल्याना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असा शासन निर्णय घेवून आले. पण वाचल्यावर पण त्यात खुट्टी मारली होती.

आपल्याशी आतापर्यंत खूप खेळ खेळलाय. आता तरी भानावर येवू, असे आवाहन करत शेवटचा लढा द्यायचा. आता माघार घ्यायची नाही. आरक्षणासाठी 40 वर्षे गेली. आता 40 दिवसाचा वेळ देवू, जी समाजाची वेदना ती मांडतोय. हे आंदोलन सामान्य मराठ्यानी हातात घेतले असून, त्यात दोन गट पाडू शकत नाही. आंतरवालीतील विराट रूप बघून शासनाला निर्णय घ्यावा लागेल.

प्रास्तावित सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष माऊली पवार म्हणाले की, मराठा आरक्षणात आंतरवाली घटना घडल्यावर जिल्ह्यात सर्वात जास्त आंदोलने मंगळवेढ्यात झाली. मनोज जरांगे पाटीलांनी मराठा आरक्षणाचा घास अंतीम टप्प्यात आणलाय. 14 ऑक्टोबरला पुर्ण ताकदीने जालन्याला जायचे. सभेचे सुत्रसंचालन भारत मुढे यांनी केले. एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. या घोषणेने सभा दणाणून गेला.

मी प्रश्न विचारले की, साहेबाला विचारून येतो म्हणायचे पण पट्ट्या आलाच नाही. आपण साधा सोपा प्रश्न विचारतो किचकाटत शिरत नाही. पण जातीवंत शेतकऱ्याचा पोरगा असल्याने मला कशाची गरज नाही. समाजच माझे मायबाप, घरातून बाहेर पडताना बायकोचो कंकू पुसून सांगीतलं. जगलो तर तुझा, नाय जगलो तर समाजाचा.

राजकीय नेत्याविना व्यासपीठ

4 वा. होणारी यल्गार सभा तब्बल 3.30 उशिरा झाली. तरीही मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज जरांगे या सत्कार राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेल्या विद्यार्थीनीच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कोणत्याही पक्षाच्या नेत्याला बसण्याची संधी दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : जरा 'बडबड' कमी कर... वीरेंद्र सेहवागचा KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाला, बच्चन, तेंडुलकर यांच्याकडून शिक

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

SCROLL FOR NEXT