mudhvi. 
सोलापूर

बिनविरोधची मुढवी ग्रामपंचायतीची परपंरा कायम ! दाखल अर्जांमधून किती बाद होतात, याकडे तालुक्‍याचे लक्ष

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 894 उमेदवारांनी 910 अर्ज दाखल केले. सर्वाधिक उमेदवारी अर्ज मरवडे, बोराळेचे दाखल झाले. कायमस्वरूपी तालुक्‍यातील कोणत्याही राजकीय नेत्याचे आवाहन न स्वीकारता सलग 30 वर्षे मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परपंरा या वेळी कायम राहिली आहे. या निवडणुकीत तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या गावांचा या आखाड्यात समावेश आहे. त्यामुळे उर्वरित चार दिवसांत त्यांची गावे कोरोना संकटात बिनविरोध होतात की निवडणुका लागतात? याकडे लक्ष लागले आहे. 

ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन करण्यात आले होते, परंतु सर्व्हर डाउन झाल्यामुळे शासनाने अंतिम दिवशी ऑफलाइन अर्ज दाखल करण्याचा पर्याय उमेदवारांसमोर ठेवल्यामुळे तहसील कार्यालयाला बुधवारी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. प्रत्यक्ष गर्दीची परिस्थिती पाहता मंगळवेढ्यातून कोरोना हद्दपार झाला की काय, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. आता अर्ज छाननीत किती उमेदवारांचे अर्ज बाद होतात? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

ग्रामपंचायतनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे
मरवडे 74, लमाण तांडा 31, तांडोर 29, सिद्धापूर 51, कात्राळ 21, आसबेवाडी 29, बोराळे 74, गणेशवाडी 37, डोणज 42, हुलजंती 71, महमदाबाद शे. 19, मल्लेवाडी 19, नंदेश्वर 67, लेंडवेचिंचाळे 42, लवंगी 31, अरळी 3, सलगर बुद्रूक 49, माचणूर 36, तामदर्डी 24, घरनिकी 18, भोसे 60, कचरेवाडी 38 इतके अर्ज दाखल झाले. 

नंदेश्वर ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल तर रुग्णवाहिका भेट देण्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची घोषणा होताच, चोखामेळा नगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुहास पवार यांनी, 35 गावांच्या पाणी आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात खळबळ उडवून देणारे सलगर बुद्रूक गाव जर बिनविरोध होत असेल तर एक लाख रुपये देण्यास तयार असल्याची घोषणा केली. उर्वरित चार दिवसांत गावगाड्यासह तालुक्‍यातील नेत्याला ग्रामपंचायती बिनविरोध करण्यास यश येते काक्ष्‌ हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT