Mango inflow in Solapur district is low this year 
सोलापूर

म्हणून यंदा गावरान आंबा बाजारात कमीच आला 

राजाराम माने

केतूर (सोलापूर) : हंगाम अंतिम टप्प्यात आल्यावर दरवर्षी गावरान आंब्याची आवक सुरू होते. परंतु गतवर्षी वारंवार बदलणाऱ्या लहरी हवामानामुळे व कमी प्रमाणात पडलेल्या थंडीमुळे झाडांना कमी प्रमाणात आलेला मोहोर या सर्वांचा फटका गावरान आंब्याला बसला आहे. किरकोळ बाजारात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दिसणारा गावरान आंबा यंदा मात्र दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावरान आंब्याचा दरवळणारा सुवास यावेळेस गायब झाला आहे. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा 
दरवर्षी या हंगामात बाजारात गावरान आंबा दाखल होत असतो. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणावर वातावरण बदलाचा फटका आंब्याला बसला. अपेक्षित मोहोर आलाच नाही, त्यामुळे फळधारणा झाली नाही. त्यातच मध्यंतरी झालेल्या वादळी वाऱ्याने आहे तो मोहर पडल्याने नुकसान झाले. त्यामुळे या हंगामात नागरिकांना मात्र गावरान आंब्याच्या सुवासाला मुकावे लागले आहे. बाळासाहेब कोकणे म्हणाले, गतवर्षी पाऊस डिसेंबरपर्यंत लावल्यानेकमी प्रमाणात थंडी पडली त्यामुळे शहरांना अल्पप्रमाणात मोहराला काही झाडांना मोहर आला नाही आलेल्या झाडांनातरीही मध्यंतरी झालेल्या वादळी वारा पडून नुकसान झाले व्यापारी अजित शेख म्हणाले, दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात गावावरान आंब्याची आवक होते.गावरान आंब्याला घरगुती ग्राहकांकडून मोठी मागणी असते परंतु,यावर्षी गावरान आंबा अतिशय अल्प प्रमाणात बाजारात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT