मनोहरमामाचा 'अटकपूर्व'चा प्लॅन पोलिसांनी लावला उधळवून! Canva
सोलापूर

भोंदू मनोहरमामाचा 'अटकपूर्व'चा प्लॅन पोलिसांनी लावला उधळवून!

मनोहरमामाचा 'अटकपूर्व'चा प्लॅन पोलिसांनी लावला उधळवून! असा आला करमाळा पोलिसांच्या ताब्यात

अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

मनोहर भोसले याच्यावर करमाळा पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून तो मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार होता.

करमाळा (सोलापूर) : मनोहर भोसले (Manohar Bhasle) याच्यावर करमाळा पोलिसांत (Karmala Police) बलात्काराचा गुन्हा (Crime) दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून तो मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) अर्ज दाखल करणार होता. त्यामुळे रविवारी (ता. 19) बारामती (Baramati) न्यायालयासमोर भोसले याच्या वकिलांच्या वतीने त्याला न्यायालयीन कोठडीची मागणी न करता पोलिस कोठडी मिळावी, यावर भर दिला. मात्र, करमाळ्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे (Police Inspector Suryakant Konkene) यांनी भक्कमपणे बाजू मांडत भोसलेचा डाव उधळून लावत त्याला न्यायालयीन कोठडी मिळवली. त्यामुळे मनोहर हा अखेर करमाळा पोलिसांच्या ताब्यात आला. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक कोकणे यांनी दिली.

भोसले यास बारामतीच्या पोलिस कोठडीत ठेवून आगामी दोन ते तीन दिवसांत प्रयत्न करून मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवायचा, असा प्रयत्न भोसले याच्या वकिलांचा होता. मात्र, हा प्रयत्न पोलिसांच्या अचूक प्रयत्नांमुळे फसला. सोमवारी (ता. 20) भोसले यास करमाळा न्यायालयासमोर उभे केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

करमाळा तालुक्‍यातील उंदरगाव येथील मनोहर भोसले याच्यावर करमाळा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी मनोहर भोसले बारामती न्यायालयातून करमाळा पोलिसांना दुपारी एकच्या सुमारास ताब्यात मिळाला. त्यानंतर पोलिस निरीक्षक कोकणे हे मनोहरला करमाळ्यात घेऊन आले. दुपारी तीनच्या सुमारास करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास करमाळ्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. करमाळा पोलिस ठाण्यात ता. 9 रोजी मनोहर भोसले व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच दिवशी बारामती पोलिसातही फसवणूक व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, 10 सप्टेंबरला पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सालपे (ता. लोणंद, जि. सातारा) येथील एका फार्म हाउसमध्ये लपून बसलेल्या भोसलेला ताब्यात घेऊन बारामती पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर भोसलेला प्रथम पाच दिवस व नंतर तीन दिवस पोलिस कोठडी दिली होती. मनोहर भोसले याच्यासह तिघांवर बलात्काराच्या गुन्ह्यासह अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस कोठडी संपल्याने बारामती न्यायालयाने रविवारी (ता. 19) मनोहर भोसलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलिस कोठडी मिळावी, म्हणून भोसले याने न्यायालयात वकिलांची फौज उभी केली होती. बारामती पोलिसांच्या कोठडीत दोन ते तीन दिवस राहून दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयातून जामीन मिळविण्याचा भोसले आणि त्याच्या वकिलांचा डाव होता. मात्र, करमाळा पोलिसांनी तो उधळून लावत त्याला ताब्यात घेतले. करमाळ्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे स्वतः बारामती न्यायालयात गेले होते. त्यांनी करमाळा पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासकामी भोसलेची मागणी केली. त्यानुसार बारामती न्यायालयाने मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ‘एपस्टीन’चा वापर करून सहीसाठी दबाव; भारत-अमेरिका करारावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप

Kolhapur Cleaning Cmpaign : दोन बोटींतून नदीतील कचरा बाहेर; आपदा मित्रांच्या धडाकेबाज कामगिरीने बदलला घाटाचा चेहरा

Igatpuri School Accident : इगतपुरीत Little Blossom शाळेच्या आवारात शिक्षकाने विद्यार्थ्याच्या अंगावर घातली कार; CCTV फुटेज पाहिल्यावर पालकांचा संताप

Kolhapur Cleaning Cmpaign : अवघ्या अडीच तासांत दोन टन कचरा हटवला; पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा झळाळून निघाला!

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्त; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

SCROLL FOR NEXT