manoj jarange sakal
सोलापूर

Manoj Jarange : मंगळवेढ्यात साडेतीन तास उशिरा तरीही उत्स्फूर्त गर्दी

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासूनची जोर धरत आहे

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवेढ्यातील सभेस मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील साडेतीन तास उशिरा आले. तरी देखील सभेत उत्साह दिसून आला. उपस्थित मराठा समाजाची मने मनोज जरांगे पाटलांनी प्रबोधनाने जिंकली

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासूनची जोर धरत आहे त्या अनुषंगाने राज्यपारात झालेल्या विविध आंदोलनामध्ये मंगळवेढेकरांचा नेहमी सहभाग राहिलेला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात पोलिसांनी मराठा बांधवांवर केलेला गोळीबार व लाठी हल्ल्याचा निषेध करून

या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून सकल मराठा समाज मंगळवेढा यांच्या वतीने सलग सहा दिवस साखळी पद्धतीने आंदोलन करून सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधण्यात आले. या सहा दिवसाच्या आंदोलनामध्ये रास्ता रोको, शहर बंद, अर्ध नग्न आंदोलन, मुंडन आंदोलन, सरकारच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून श्राद्ध घालण्यात आले आंदोलन स्थळी रक्तदान शिबिर घेऊन मराठा समाज विधायक काम देखील करू शकतो हे दाखवून देण्यात आले.

जिल्ह्यात कुठेही आंदोलन असताना गत महिन्यात मंगळवेढ्यातील आंदोलन हे जिल्ह्यात चर्चेत आले. त्यामुळे मंगळवेढ्यातील आंदोलनाची ढग पाहता मनोज जरांगे पाटील यांच्या राज्याच्या दौऱ्यात सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यात सभा घेण्याचा मान मिळाला.

या सभेसाठी तब्बल साडेतीन तास उशिरा येऊन नागरिकांनी मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मराठा समाजाने साखळी करून त्यांना गर्दीतून सभास्थळी नेले. साधारण अर्धा तासाच्या भाषणात त्यांनी मराठा समाजाचे प्रबोधन करताना सत्तेसाठी सर्व राजकीय पक्ष एकमेकांचे वैर विसरून एकत्र येऊ लागले

आणि आपण आरक्षणासाठी एकत्र येत नसल्याची खंत व्यक्त करून सरसकट मराठा प्रमाणपत्र द्यावे. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही असा इशारा देत चाळीस वर्षे गप राहिलं आता चाळीस दिवस देखील गप राहो पण आरक्षण घेऊ.

जातिवंत शेतकऱ्यांचा पोरगा असल्याने मला कशाची गरज नाही समाजच माझा मायबाप असून घरातून बाहेर पडताना बायकोचे कुंकू पुसून सांगितले.जगलो तर तुझा आणि मेलो तर समाजाचा अशा पद्धतीने या सभेत मराठा तरुणांना प्रोत्साहित केले. मंगळवेढ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय नेत्यांना व्यासपीठापासून दूर ठेवले. त्यामुळे मराठा समाजाची धग आगामी काळात राजकीय पक्षाला देखील बसण्याची शक्यता नाकारता येत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT