solapur univercity sakal
सोलापूर

Solapur News: हाताने गुण देण्याची पद्धत आता कायमची बंद!विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणी संगणकावर ऑनस्क्रिन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सध्या सुरू आहे. या परीक्षांची उत्तरपत्रिका तपासणी हाताने नव्हे तर संगणकावर ऑनस्क्रिन केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात १७ केंद्रे स्थापन केली असून विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक संगणकावर पेपर तपासत आहेत.

तात्या लांडगे

Solapur News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सध्या सुरू आहे. या परीक्षांची उत्तरपत्रिका तपासणी हाताने नव्हे तर संगणकावर ऑनस्क्रिन केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात १७ केंद्रे स्थापन केली असून विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक संगणकावर पेपर तपासत आहेत.

उत्तरपत्रिका तपासणीतील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, त्यावर हाताने खाडाखोड करता येवू नये आणि वेळेची बचत व स्पष्टता, पारदर्शकता राहावी या प्रमुख हेतूने सोलापूर विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे. यंदा पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांची संगणकावर ऑनस्क्रिन तपासणी केली जात आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी १०९ महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठातील कॅम्पस व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या पाहता प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीला खूप वेळ लागायचा. त्यामुळे निकाल विलंबाने लागल्याने अनेक विद्यार्थ्यांना जॉब तथा पुढील शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आता विद्यापीठाने ऑनस्क्रिन उत्तरपत्रिका तपासणीची पद्धत अवलंबली आहे. आता १७ केंद्रांवर ऑनस्क्रिन उत्तरपत्रिकांची पडताळणी होईल.

त्यामुळे १५ ते ३० दिवसांत निकाल शक्य होणार आहे. विद्यापीठाने त्यासंदर्भात प्राध्यापकांना परीक्षेपूर्वीच प्रशिक्षण दिले आहे. यापूर्वी विद्यापीठाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची ऑनस्क्रिन तपासणी केली होती. आता सर्वच अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी त्या पद्धतीने केली जात आहे.

विद्यापीठाची सद्यःस्थिती

  • संलग्नित महाविद्यालये

  • १०९

  • एकूण विद्यार्थी

  • ७८,०००

  • उत्तरपत्रिकांची संख्या

  • ४,६८,०००

  • उत्तरपत्रिका तपासणीचा वेळ

  • १०-१५ मिनिटे

ऑनस्क्रिन मूल्यमापन म्हणजे काय?

अध्यापनाचा किमान तीन वर्षांचा अनुभव आणि महाविद्यालयांमधील पूर्णवेळ तथा पात्र प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीचा अधिकार देण्यात आला आहे. विषयनिहाय तज्ज्ञ प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची ऑनस्क्रिन तपासणी केली जात आहे.

ऑनस्क्रिन मूल्यमापन म्हणजेच संगणकावर विषयानिहाय सर्व उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जातात. संगणकावर दिसणाऱ्या उत्तरपत्रिकांची तपासणी संबंधित प्राध्यापक करतात. विद्यापीठाने ऑनलाइन पाठवलेल्या उत्तरपरित्रकेच्या फॉरमॅटनुसार प्राध्यापक गुणदान करतात आणि त्यांनी दिलेले गुण तेथून आपोआप ते गुण विद्यापीठाला जातात. त्यावरून निकाल तयार केला जातो.

१७ केंद्रांवर ऑनस्क्रिन मूल्यमापन

स्पष्ट व पारदर्शक मूल्यमापन व्हावे, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी निकालासंदर्भात काहीही अडचणी येवू नयेत आणि त्यांचा निकाल जलदगतीने जाहीर व्हावा या उद्देशाने विद्यापीठाने यावर्षीपासून १०० ऑनस्क्रिन मूल्यमापन सुरू केले आहे. किमान २५ संगणक व इंटरनेटची सुविधा असलेल्या १७ महाविद्यालयांमध्ये ऑनस्क्रिन मूल्यमापन केंद्रे असतील.

- डॉ. शिवकुमार गणपूर, परीक्षा व मूल्यमापन संचालक, सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघाने Playing XI मध्ये काय करावा बदल? पाँटिंग, शास्त्रींनी 'त्या' एका खेळाडूचं नाव घेत स्पष्ट सांगितलं

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याने खळबळ, सिमकार्ड, पॉवर बँक, चार्जर आणि वायर जप्त

Congress vs BJP Political Clash : 'दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था, शेवट जवळ आलाय'; डीके शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

SCROLL FOR NEXT