SMC 
सोलापूर

अर्रर्रर्रऽऽ ! करसंकलन प्रमुखासह 159 पैकी 155 जण झाले परीक्षेत नापास; आता अधिकाऱ्यांची गच्छंती अटळ

तात्या लांडगे

सोलापूर : कर संकलन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मालमत्ता मोजणीसह अन्य प्रकारची माहिती असल्याची खात्री करणे, जेणेकरून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, या हेतूने आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी करसंकलन विभागासह अन्य विभागातील इच्छुकांची परीक्षा घेतली. 159 जणांपैकी केवळ चारजणच परीक्षेत उत्तीर्ण झाले असून नापास झालेल्यांत खुद्द करसंकलन विभागप्रमुखासह काही कर निरीक्षकांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. 

सरकारी नोकरीतून महापालिकेत रुजू झाल्यानंतर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 मधील 493 कलमे आणि त्यातील 31 प्रकरणाची माहिती असावी, असे गृहीत धरले जाते. मात्र, करवसुलीची पद्धत आणि करवसुलीची रक्‍कम, यावरून महापालिका आयुक्‍तांनी या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तर अन्य विभागांमधून कर संकलन विभागात येण्यास इच्छुक असलेल्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. 1 आणि 5 एप्रिलला त्यांची दोन टप्प्यांत परीक्षा घेण्यात आली. 

तत्पूर्वी, महापालिका अधिनियमातील 19 प्रकरणांपैकी मालमत्ता करासंबंधीचे प्रकरण 11 मधील 127 ते 152 कलमावर अभ्यासक्रम ठरविण्यात आला होता. आठ नंबर प्रकरणातील 63 नियमांवरही काही प्रश्‍न विचारण्यात आले होते. मात्र, धक्‍कादायक बाब म्हणजे, मागील 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अचूक उत्तरे लिहिता आली नाहीत, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. आता 20 कर निरीक्षक आणि करसंकलन विभागप्रमुखाची हकालपट्टी करून त्या ठिकाणी पास झालेल्यांसह परीक्षेत अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची नियुक्‍ती केली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

लिपिकांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती 
महापालिकेतील लिपिकांना वरिष्ठ लिपिकपदी अथवा वरिष्ठ श्रेणी लिपिकपदी पदोन्नती देताना त्यांची विभागीय परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मागील खूप वर्षांपासून आकृतिबंधच मंजूर नसल्याने बहुतेक कर्मचाऱ्यांना तशीच पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे अनेकांना संगणकावर काम करता येत नाही, संगणकाचे ज्ञान नाही, त्यांना संगणकावर काहीच कागदपत्रे तयार करता येत नसल्याची बाब समोर आली आहे. संगणकावर काम करण्याऐवजी करवसुलीसह अन्य कामे आम्हाला दिल्याचेही काहींचे म्हणणे होते. मात्र, आता करसंकलन विभागाच्या परीक्षेतून पुन्हा एकदा त्यांची बौद्धिक पात्रता सिद्ध झाली आहे. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत महापालिका आयुक्‍त काय भूमिका घेतात, त्यांच्यावर काय कारवाई होणार, याची उत्सुकता लागली आहे. 

लिपिकांना मिळणार शेवटची संधी 
संणकीय ज्ञान नसलेल्या 532 लिपिकांची काही महिन्यांपूर्वी दोनवेळा परीक्षा पार पडली. त्यात जवळपास 85 टक्‍के लिपिकांना पास होता आले नाही. आयुक्‍तांनी त्यांना मूळ वेतनावर आणले जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी लिपिकांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. या परीक्षेत नापास झालेल्या लिपिकांवर मात्र निश्‍तिचपणे कारवाई केली जाणार असून, त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केल्याचेही बोलले जात आहे. 

कर संकलन वाढण्यास होईल मदत 
लेखी परीक्षेत 50 टक्‍के गुण प्राप्त करतील अथवा त्यापेक्षा कमी गुण मिळालेल्यांमधून सर्वाधिक गुण मिळविलेल्यांनाच कर आकारणी व कर संकलन विभागात ठेवले जाईल. उर्वरित कर्मचाऱ्यांची अन्य विभागात बदली केली जाणार असून त्यासंबंधी आयुक्‍तांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल; जेणेकरून आगामी काळात महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलनास अडचणी येणार नाहीत. 
- जमीर लेंगरेकर, 
उपायुक्‍त, सोलापूर महापालिका 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT