Solapur  sakal
सोलापूर

Solapur News : "माझ्या लिखाणावर टीका करताना खूप लिहतात म्हणून टीका करतात मात्र काय लिहिले आहे हे वाचत नसल्याचे खंत"

धर्म आणि जाती गुंडाळून ठेवून माणूस म्हणून जगले पाहिजे देशात पुरोगामीत्वाच्या खूप चळवळी झाल्या आणि वाया गेल्या साडेतीन हजार वर्षात एकच चळवळ कायमस्वरूपी यशस्वी झाली. भविष्यात आ. ह यांच्या नावाने इतिहास परिषद स्थापन करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा- यावेळी बोलताना साहित्यिक राजन खान म्हणाले की बुद्धांनी उभी केलेली चळवळ कुठे गायब झाली हे कुठे ही उपलब्ध नाही सध्या बुद्धाचा पुतळ्या पुरता, चेष्टेचा आणि सजावटीचा विषय करून ठेवला आहे त्यांचे विचार मेंदूत शून्य आहेत महाराजांचा इतिहास शोधल्यानंतरही हिंदू हा शब्द कुठेही सापडत नाही.

म्हणून धर्म आणि जाती गुंडाळून ठेवून माणूस म्हणून जगले पाहिजे देशात पुरोगामीत्वाच्या खूप चळवळी झाल्या आणि वाया गेल्या साडेतीन हजार वर्षात एकच चळवळ कायमस्वरूपी यशस्वी झाली. भविष्यात आ. ह यांच्या नावाने इतिहास परिषद स्थापन करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले

मंगळवेढ्याच्या संतनगरीत आ.ह. साळुंखे यांच्या विचाराची पेरणी करताना आ.ह.विचारवारी हा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली असे गौरवोद्गार धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केले.

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले की शालेय जीवनापासून त्यांच्या पुस्तकाच्या वाचनाची सवय लागली.त्यांचे विचार आपल्या वाचण्यात आल्याने समाधान वाटले परंतु आज त्यांच्यासमोर बोलण्याचाही योग आला.

यावेळी डॉ. कृष्णा इंगोले लिखित स्वरूप आणि विकास, डाॅ. मधुकर जाधव लिखित सरसेनापती प्रतापराव गुजर व डॉ. सुचित्रा घोगरे काटकर लिखित एक पाऊल सकारात्मकतेचे या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले झाले.यावेळी विचार सामर्थाचे दर्शन आ.ह. या विचारावर विषयावर बोलताना साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले म्हणाले की, विचारवंत हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे.

त्याची कदर केली पाहिजे माणसाचे मत विचारावर, कृतीवर आणि त्याच्या ज्ञानावर अवलंबून असते, डाॅ जगदीश कदम (नांदेड) आ.ह.विचार भुमिका -ना गुलाम ना उद्दाम,सत्यशोधक आ.ह.विचार आणि कृती यावर डाॅ श्यामसुंदर मिरजकर,व शोषीतांना मुक्तीकडे नेणारा विचारवंत यावर काॅ तानाजी ठोंबरे यांनी विचार व्यक्त केले.

सूत्रसंचालन कवी इंद्रजीत घुले यांनी केले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून जवळपास 200 पेक्षा अधिक साहित्यिक विचारवंत मंगळवेढा मुक्कामी आले आहेतकार्यक्रम स्थळी नामवंत लेखकाच्या पुस्तकाचे स्टॉल देखील लावण्यात आलेले आहेत.

आप्पाश्री लाॅन्समध्ये गौरव परिवर्तन विचाराचा आ.ह.विचारवारी या दोन दिवशीय साहित्यीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास स्वागत अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे डॉ आ.ह. साळुंखे, डॉ कृष्णा इंगोले,डाॅ. मधुकर जाधव, ऍड सुचित्रा घोगरे, महावीर जोंधळे,डाॅ. प्रदीप आवटे, तानाजी ठोंबरे, शामसुंदर मिरजगावकर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, जिल्हा नियोजन मंडळ माजी सदस्य अजित जगताप,गटविकास अधिकारी आनंद लोकरे आदीची उपस्थिती होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT