Maratha Morcha 
सोलापूर

मराठा क्रांती मोर्चाने केले तिरडी आंदोलन (Video)

अरविंद मोटे

सोलापूर : येथील शिवाजी चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. रविवारी (ता. 13) सकाळी पावणे अकरा वाजता मराठा समाजातील 35 ते 40 तरुण रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनातून शिवाजी चौकात जमले. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुप्रिम कोर्ट, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची तिरडी काढण्यात आली. सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारची तिरडी काढण्यात आली. या वेळी तिरडी तयार करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांचे फोटो लावून तिरडी काढण्यात आली.

या वेळी केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा "राम नाम सत्य है', "एक मराठा लाख मराठा', "आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या...' अशा घोषणा देण्यात आल्या. भगव्या टोप्या, भगवी उपरणे घालून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार, अजिंक्‍य पाटील, ओम घाडगे, अर्जुन सोनवणे, राज पवार, राहुल दहीहंडे, कुणाल मोरे, श्रीकांत जाधव, अक्षय पांडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सच्या गळाला मोठा मासा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पाकिस्तान सुपर लीगला मारली 'लाथ'

Ashok Kharat मी पहिल्यांदाच हे ऐकतोय! खरात कोर्टात काय बोलला? मंदिरातही कधीतरी जायचो, तिथे...

कोल्हापुरात पंपांवर रांगा! जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं पॅनिक बायिंग न करण्याचं आवाहन, म्हणाले, पुरेसा इंधन साठा

Recharge New Rules : मंथली प्लॅनच्या नावाखाली लूट थांबणार? वर्षात महिने १२ पण रिचार्ज १३; कंपन्यांना सरकारचा इशारा, ग्राहकांना होणार फायदा

Latest Marathi News Live Update : खरातप्रकरणी तपासामध्ये काही प्राण्यांचे अवयव मिळून आले- पीडितेचे वकील

SCROLL FOR NEXT