Manoj jarenge patil  मनोज जरांगे पाटील ११ ऑगस्टला पुण्यात, असा असेल शांतता रॅलीचा मार्ग
सोलापूर

Maratha Reservation: सोलापूरात मराठा समाजाची झाली महत्त्वाची बैठक, वाचा त्यात काय ठरलं?

Manoj Jarange Patil: करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil Solapur Rally : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे सात ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली होणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने करमाळा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.

करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. या शांतता रॅलीसाठी करमाळ्यातील मराठा बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान सोलापूर जिल्हा मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केले.

यावेळी माऊली पवार म्हणाले, सरकार जाणूनबुजून मराठा व इतर समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आपला लढा हा कोणत्याही जातीच्या व धर्माचे विरोधात नसून आपल्याला आपल्या हक्काचे ५० टक्क्यांच्या आतून ओबीसी आरक्षण मिळवायचे आहे व आपल्या लेकरा-बाळांचे भवितव्य सुरक्षित करायचे आहे म्हणून सर्व मराठा समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आव्हानही त्यांनी आहेत.

करमाळा तालुक्यातील या बैठकीसाठी माजी आमदार नारायण पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप, कमलाई कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, भाजपचे दिग्विजय बागल, प्रा. गणेश देशमुख, प्रा. शिवाजी शिंदे, जीवन यादव, वैभव पवार मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. प्रास्ताविक करमाळा तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य मिलिंद फंड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT