Manoj Jarange Patil  sakal
सोलापूर

Maratha Reservation : सरकारवर दबाव! तीव्र लढा, प्रकृतीची चिंता... लक्ष्य मात्र आरक्षण

मराठा आरक्षण हाच विषय सध्या सर्वत्र चर्चेत आहे. आरक्षणासाठी अन्न व जलत्याग केलेल्या मनोज जरांगे-पाटलांच्या प्रकृतीबद्दल तमाम मराठ्यांच्या मनात चिंतेचे काहूर उठलंय.

सकाळ वृत्तसेवा

- शिवाजी भोसले

सोलापूर - मराठा आरक्षण हाच विषय सध्या सर्वत्र चर्चेत आहे. आरक्षणासाठी अन्न व जलत्याग केलेल्या मनोज जरांगे-पाटलांच्या प्रकृतीबद्दल तमाम मराठ्यांच्या मनात चिंतेचे काहूर उठलंय. यापूर्वीच उपोषणानं अत्यंत अशक्त झालेल्या जरागेंना या दुसऱ्या टप्यावरचं उपोषण कसं पेलणार?

त्यांच्या प्रकृतीचं काय? याचं भय मराठ्यांना वाटतंय. दुसऱ्या बाजूला हाता-तोंडाशी आलेला आरक्षणाचा घास हिरावला जाऊ नये, यासाठीच्या निर्णायक उठावात तमाम मराठे सहभागी होताहेत. एकसंधतेची व्रजमुठ दिवसेंदिवस आवळली जात आहे. ‘अभी नही, तो कही नही’चा नारा देत अक्षरश: मराठे पेटून उठलेत.

आंदोलनांच्या तीव्रतेची धग वाढतंच चालली. जरांगेंच्या उपोषणाचं काय होणार? राज्यकर्ते नेमका कोणता निर्णय घेणार? राज्यभरातील आंदोलनांमधून चिघळत चालेल्या परिस्थितीचं काय? हा अत्यंत ‘कळी’चा मुद्दा आहे.

दरम्यान, अत्यंत वेगळ्या वळणावर जात असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकार तमाम मराठ्यांची समजूत तरी कशी काढणार? राज्यभरातील आंदोलने हाताबाहेर जाणार नाहीत? यासाठी परिस्थिती कशी हाताळणार? मराठा आरक्षणाचं झंझावती वादळ शमणार कसं ? आरक्षणासाठी पेटून उठलेला मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत तरी कसा होणार? नेमकं होणार तरी काय? या वास्तव आणि खऱ्याखुऱ्या परिस्थितीची मोट कशी आवळली जाणार? हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरत आहे.

मुख्यमंत्र्यांची आश्‍वासक शब्दाची फुंकर

  • मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण देण्याला सरकार कटिबद्ध

  • आरक्षणासाठीच्या नियुक्त न्या. संदीप शिंदे समितीचे काम उत्कृष्ट

  • तमाम मराठ्यांसह मनोज जरांगे पाटलांनी घ्यावी समजूतदार भूमिका

  • मराठा आरक्षण/कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी पुरावे तपासणे सुरू

  • कुणबी मराठ्यांसंदर्भात साधारण पाच हजार पुराचे तपासले

  • आणखी काही पुरावे तपासण्यासाठी समितीला मुदतवाढ

  • मराठ्यांना टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी न्यायलयाची खिडकी ओपन

  • आरक्षणासाठी न्यायालयात सरकार बाजू सक्षमपणे मांडणार

  • आरक्षणाच्या मुद्यावर सोमवारी मंत्री समितीच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित

थेट उपोषणस्थळावरचे हे वास्तव...

  • उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरागेंची प्रकृती अत्यंत खालावली

  • बोलताना होतोय अत्यंत त्रास, बोलायला नको अशी मानसिकता

  • जरागे-पाटलांच्या प्रकृतीवर उपोषणाचा परिणाम, आपोआप हात थरथरू लागले

  • आवाज अत्यंत झाला क्षीण

  • वडील आणि बहिण यांची उपोषणठिकाणी मनोज जरांगे यांच्याशी झाली नाही भेट

  • जरांगे- पाटील यांची सरकारसोबत चर्चा करण्याची तयारी

जरांगे पाटील यांना चिठ्ठी आली पण…

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला जरांगे-पाटील यांनी अन्न आणि जलत्याग करण्यासह औषधोपचार घेणे टाळल्यानंतर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीसह अन्य अनेक गावात मराठा बांधवांनी आपल्या घरची चूल पेटविणे बंद केले. यासंदर्भात एक चिठ्ठी उपोषणाच्या ठिकाणी जरांगे -पाटील यांना पोचविण्यात आल्यानंतर जरांगे-पाटील यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली. माफ करा. मी आरक्षणासाठी अन्न, जल यासह औषधांचा त्याग करणार असल्याबद्दल शब्द दिला आहे. मी शब्द माघारी घेऊन गद्दारी करु इच्छित नाही. मात्र, माझ्या मराठा बांधवांनी चुली पेटविणे बंद करु नये, आपली आबळ करुन घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

आरक्षणाच्या या टप्यावर मग पुढे काय?

  • सरकार आणि जरांगे काय निर्णय घेतात, याचे मराठ्यांना औत्सुक्य

  • आरक्षणासंदर्भात सरकारवर विश्‍वास नसल्याची मराठ्यांची भावना

  • ४० दिवस मुदत घेऊनदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीच भूमिका घेतली नसल्याचा आरोप

  • जिल्ह्याजिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्वच पक्षाच्या पुढाऱ्यांना गावबंदी राहण्यावर आंदोलक ठाम

  • राज्यकर्ते तसेच रामदास कदम, नारायण राणे, ॲड. सदारत्न गुणवर्ते यांच्यावर मराठे प्रंचड चिडून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT