Abhijit Patil Sakal
सोलापूर

Maratha Reservation : उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू

मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कार्तिकीच्या महापूजेला येण्यास उपमुख्यमंत्र्यांना विरोध.

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कार्तिकी यात्रेच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येवू नये. मराठा समाजाचा विरोध डावलून येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांचा निषेध करु, असा इशारा येथील मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी एकदिवस उपोषण करत आंदोलनाला पाठिंबा दिला.

आरक्षणाच्या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर मागील ४४ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. गणेश जाधव या मराठा तरुणाने जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव एकत्रित आले आहेत.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी कार्तिकी यात्रेच्या विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेसाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. श्री. भोसले यांच्या इशाऱ्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. शहर व तालुक्यात ठिकठिकाणी साखळी उपोषणे सुरू झाली आहे.

अनेक गावांमध्ये रॅली काढून आरक्षणाची मागणी केली जात आहे. पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू आहे. भोसे, खर्डी, उपरी येथेही साखळी उपोषणे सुरू आहे. आंदोलनाला इतर समाजानेही पाठिंबा दिला आहे.

पंढरपूर सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरपुरात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. येत्या काही दिवसात कार्तिकी यात्रेचा सोहळा आहे. कार्तिकी यात्रेची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. दरम्यान, मराठा समाजाने कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यास विरोध केला आहे.

एका सर्व सामान्य वारकऱ्यांच्या हस्ते कार्तिकीची महापूजा करावी, अशी मागणीही केली आहे. या संदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने मंदिर समितीला लेखी निवेदन दिले. मराठा समाजाच्या विरोधातनंतर उपमुख्यमंत्री पंढरपूरला येणार का, हे आता पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT