Pandharpur Bus Stand sakal
सोलापूर

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर एसटी महामंडळाची बस सेवा ठप्प

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असून, याचे पडसाद पंढरपूरमध्ये देखील पहावयास मिळत आहेत.

राजकुमार घाडगे

पंढरपूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असून, याचे पडसाद पंढरपूरमध्ये देखील पहावयास मिळत आहेत. सोमवारी रात्री (ता. ३०) भंडीशेगाव येथे काही अज्ञात व्यक्तींनी एस. टी. महामंडळाची एक बस पेटवली तर चार बसेसच्या काचा फोडल्या. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार एसटी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पंढरपूर बस आगाराचे व्यवस्थापक मोहन वाकळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. पंढरपूर तहसील कार्यालयासमोर गणेश महाराज जाधव हा तरुण मागील चार दिवसांपासून उपोषण करीत आहे. त्याला सकल मराठा समाज बांधवांचा मोठा पाठिंबा आहे.

याशिवाय प्रमुख चौकांमध्ये सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्री यांना पंढरपूर मध्ये प्रवेश बंदी असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाचे पडसाद सर्वत्र जाणवू लागले आहेत. सोमवारी रात्री भंडीशेगाव येथे काही अज्ञात व्यक्तींनी एसटी बस पेटवून दिल्यामुळे एसटी प्रशासनाने बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंढरपूर आगारातून सुटणाऱ्या सर्व बसेसची वाहतूक ठप्प झाली आहे. याचा फटका श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत आलेल्या भाविकांना देखील बसला आहे.

येथील बस स्थानकामध्ये अनेक भाविक परतीच्या प्रवासासाठी एसटी बसच्या प्रतिक्षेत बसलेले दिसून आले. एसटी बस सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने पंढरपूर बस आगाराचे दररोज लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या शेकडो बस गाड्या पंढरपूर बस आगारामध्येच थांबविण्यात आल्या आहेत. त्या बस गाड्यांच्या चालक व वाहकांच्या जेवणाची सोय पंढरपूर बस डेपोच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर बस आगारातील बस वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना सेवा देणाऱ्या बस गाड्यांचे नुकसान करू नये असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

- मोहन वाकळे, व्यवस्थापक, पंढरपूर बस आगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Tragic Incident : हृदयद्रावक! मूकबधिर मुलासोबत जगताना तरूण हताश झाला अन् न्यायालयाबाहेर उचललं टोकाचं पाऊल...

Latest Marathi News Live Update : पार्क केलेल्या बाईकवर चोरट्यांची नजर; पोलिसांची मोठी कारवाई

'सोनवणे वहिनी तर एक नंबर निघाल्या' रुचिताच्या Power Key करणच्या ताब्यात, हात जोडले एकलं नाही शेवटी तिने...

Amit Shah : 'सनातन संस्कृती नष्ट करणे अशक्य, शतकानुशतके वारंवार आक्रमणे होऊनही..'; काय म्हणाले अमित शहा?

Sindhudurg Gaur : जंगलातून थेट रस्त्यावर येणाऱ्या गव्यांना अडवणार लोखंडी कुंपण; सिंधुदुर्गात पायलट प्रकल्प सुरू

SCROLL FOR NEXT