सोलापूर

बघा..बघा.. अनुदानित मराठी शाळांचे काय होणार

संतोष सिरसट

सोलापूर ः राज्यातील मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांमधील पटसंख्या कमी असल्याचे कारण देत या शाळा मोडण्याचा घाट घातला जात आहे. पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल लक्षात घेता अनुदानित मराठी शाळा या इंग्रजी शाळांमध्ये परावर्तित करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी आहे. 

अनुदानित मराठी शाळांचा पट कमी होत असल्याने अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याउलट इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांचा कल वाढत असल्याचे भाजपच्या शिक्षक सेलचे सहसंयोजक अनिल शिवणकर यांनी शिक्षण उपसंचालकांना अनुदानित शाळा या अनुदानाचे स्वरूप कायम ठेवून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये परावर्तित करण्याबाबत पत्र दिले आहे.

या पत्राचा संदर्भ देत शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण संचालकांना पत्र पाठवून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत सांगितले आहे. मराठी शाळांची पटसंख्या कमी होत आहे म्हणून त्या शाळा अनुदानासह इंग्रजी माध्यमांमध्ये परावर्तित करण्याची पद्धत योग्य आहे का, याबाबतही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अनुदानित मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होऊन शिक्षक जर अतिरिक्त होत असतील तर त्या शाळांमधील पटसंख्या कशाप्रकारे वाढेल, हे पाहणे अपेक्षित असताना भाजपच्या शिक्षक सेलच्यावतीने मराठी शाळा या इंग्रजी शाळांमध्ये परावर्तित करण्याची केलेली मागणी अनाकलनीय असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

पटसंख्या वाढीसाठी हवी उपाययोजना 
अनुदानित मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत. जर या शाळांमध्ये पटसंख्या वाढली तर निश्‍चितच अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रमाणही कमी होणार आहे. गोरगरिबांची मुले शिकण्यासाठी अनुदानित मराठी शाळा जिवंत राहणे आवश्‍यक आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या प्रस्तावाचा शासन कशापद्धतीने विचार करते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

SCROLL FOR NEXT