सभापतीपदी समाधान पाटील व उपसभापती माणिक वाघमारे
सभापतीपदी समाधान पाटील व उपसभापती माणिक वाघमारे esakal
सोलापूर

Sangola : सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती; सभापतीपदी समाधान पाटील व उपसभापती माणिक वाघमारे यांची निवड

सकाळ वृत्तसेवा

सांगोला : सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी शेतकरी कामगार पक्षाने आपल्याकडेच ठेवत वर्चस्व कायम ठेवले आहे. शेकापने सभापतीपदी समाधान पाटील व उपसभापती माणिक वाघमारे यांना संधी दिली. दोघांचीही निवड बिनविरोध झाली आहे.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप इत्यादी पक्षांना घेऊन हालचाली केल्या होत्या. परंतु या निवडणुकीमध्ये शेकापचेच माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, राष्ट्रवादी बाबुराव गायकवाड यांनी परिवर्तन आघाडी स्थापन करून निवडणूक लावली होती.

परंतु या निवडणुकीत परिवर्तन आघाडीला यश मिळाले नव्हते. सत्ताधारी शेतकरी विकास आघाडीने सर्वच 18 जागा जिंकल्या होत्या. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेकापने सर्व पक्षाला सामावून घेऊन निवडणुकी केली असली तरी सभापती व उपसभापती पद हे स्वतःकडेच ठेवले आहे. या सभापती, उपसभापती निवडीसाठी मोठी रस्सीखेच सुरू होती.सभापती कोणाच्या गळ्यात माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शेवटी सभापतीपदी समाधान पाटील यांची तर उपसभापतीपदी माणिक वाघमारे यांची वर्णी लागली आहे. सभापती, उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पदाच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेतून समाधान पाटील तर ग्रामपंचायतच्याच अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातून माणिक वाघमारे हे निवडून आले होते.

शेकापचेच सभापती व उपसभापती निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांचीं आतषबाजी व गुलालाची उधळण केली. निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार शेकापचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख, पोपट देशमुख, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचे वर्चस्व अबाधित असून स्वर्गीय आबासाहेब (गणपतराव देशमुख) यांच्या विचारानुसार बळीराजा व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून नूतन सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांनी पारदर्शक कारभार करावा - डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT