Market Committee started in Solapur 
सोलापूर

म्हणून सोलापुरातली बाजार समिती सुरू; अन्‌ मंगळवार बाजारात तर भयानच स्थिती... (Video)

अशोक मुरुमकर

सोलापूर : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर "कोरोना'चा अद्याप काहीही परिणाम जाणवत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कायम असून "कोरोना'च्या प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून कर्मचारी आणि व्यापारी दक्षता घेत आहेत. मात्र, मंगळवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारावर अत्यल्प परिणाम होता. हा बाजार बंदच ठेवायचा होता. मात्र, अचानक शेतकऱ्यांना माहिती देणे शक्‍य नव्हते म्हणून बाजार सुरू ठेवल्याचे येथील कर्मचाऱ्याने सांगितले. तर शहरातला सर्वात मोठा समजला जाणाऱ्या आठवडा बाजारात नेहमीपेक्षा गर्दी कमी होती. या बाजारात 500 रुपयांची गावरान कोंबडी 200 रुपयांना दिली जात होती. 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह नगर, लातूर, उस्मानाबाद येथून व शेजारी आंध्र प्रदेश व कर्नाटकमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल घेऊन येतात. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून आठवडा बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मात्र, सोलापूर बाजार समितीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मंगळवारी येथे जनावरांचा बाजारही भरतो. त्यात बकरे मोठ्याप्रमाणात विक्रीसाठी येतात. त्यानुसार मंगळवारी बाजार समितीच्या समोरील जागेत मोठ्याप्रमाणात बकरी विक्रीसाठी आली होती. तेथील एका कर्मचाऱ्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले की, या बाजारात ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात शेतकरी बकरी विक्रीसाठी येतात. अचानक बाजार बंद केला असता तर त्यांची अडचण झाली असती. त्यामुळे बाजार बंद केला नाही. मात्र, पुढच्या मंगळवारचा बाजार भरेल की, नाही हे सांगता येणार नाही. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर आम्ही काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
बाजार समितीमध्ये प्रवेशद्वारात असलेले सुरक्षा रक्षकही मंगळवारी सकाळपासून तोंडाला रुमाल बांधून उभा असल्याचे चित्र होते. व्यापारीही काळजी घेताना दिसत होते. बाजार समितीच्या मुख्य इमारतीत प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हाताला सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात होता. व्यापाऱ्यांनाही दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी जागृती करण्याचे फलक लावण्यात आले आहेत. 


"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या निर्णयानुसार कामकाज सुरू आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हाताला सॅनिटाझर लावूनच प्रवेश दिला जात आहे. व्यापाऱ्यांनाही योग्य त्या सूचना दिल्या आहेत. जागृतीसाठी पत्रकेही लावण्यात आली आहेत. 
- उमेश दळवी, प्र. सचिव, 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममता बॅनर्जी कोलकाता हायकोर्टात दाखल, भवानीपूरच्या निकालाविरोधात दाखल केली याचिका, पश्चिम बंगालमध्ये घडामोडींना वेग

Fifa World Cup 2026 : स्पेन साखळी फेरीतच घरी जाणार? दुबळ्या केप व्हर्दे संघाने 'बरोबरी'त रोखल्याने माजी विजेत्यांचे समीकरण बिघडले

‘हे गाणं प्रेग्नेंसीत रेकॉर्ड केलं होतं’ परिणीती चोप्राचं 'नमामी शमीशान' शिवभक्ती गीत चर्चेत, सोशल मीडियावर Viral Video

Latest Marathi News Live Update : शिवसेना अधिक बळकट होणार असल्याचा दीपक केसरकर यांचा दावा

पुनर्वसनावरून केडीएमसी महासभेत खडाजंगी! "आमदारांसाठी एक आणि नगरसेवकांसाठी दुसरा नियम आहे का?" भाजप नगरसेवकांचा सवाल

SCROLL FOR NEXT