Vitthal-Rukmini Marriage 
सोलापूर

विठ्ठल-रुक्‍मिणीचा शाही विवाह सोहळा थाटात ! मोजक्‍याच वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : "या पंढरी नगरीत... काय वाजत गाजत... सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं...' अशा उत्साहात आज (मंगळवारी) साक्षात विठ्ठल- रुक्‍मिणीचा शाही विवाह सोहळा दुपारी 12 वाजता मोठ्या उत्साहात विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात पार पडला. 

माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी. वसंताची चाहूल लागते म्हणून माघ महिन्यातील शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते. हाच दिवस श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचा विवाह सोहळा म्हणून साजरा करतात. आज राजेशाही पद्धतीने हा विवाह सोहळा विठ्ठल मंदिरात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला. 

आज श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर संपूर्ण फुलांनी सजले होते. ज्या ठिकाणी देवाचा विवाह होतो तो सभामंडप लाल- पिवळ्या व पांढऱ्या फुलांच्या माळांनी सजला होता. यासाठी तब्बल पाच टन फुले वापरली आहेत. पुण्यातील भाविक भारत भुजबळ यांनी आकर्षक सजावट केली. 

या पारंपरिक उत्सवात स्वयंवर ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे माघ शु. पंचमी ही कृष्ण - रुक्‍मिणी विवाहाची तिथी आहे. रुक्‍मिणी स्वयंवर कथा सांगून या कार्यक्रमास सुरवात झाली. नंतर विवाह उत्सव साजरा करायला सुरवात झाली. रुक्‍मिणी मातेकडे प्रतिपदा ते पंचमी उत्सव होतो. अलंकार घालतात. पंचमीला दुपारी विवाह कथा होऊन अक्षता टाकतात. संध्याकाळी रथोत्सव होतो. 

विठ्ठल - रुक्‍मिणीचा विवाह सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र यंदा कोरोना संसर्गामुळे मोजक्‍या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बाराच्या सुमाराला विठ्ठल आणि रुक्‍मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्ती सभामंडपात आणल्या. डोक्‍यावर पगडी, अंगी सोवळे, कपाळी मुंडावळ्या असा सजलेला देखणा विठू माऊली आणि पैठणी, अंलकाराने सजलेली रुक्‍मिणी माता यांचं रूप अनेकजण डोळे भरून पाहात होते. मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या सुमधुर आवाजात उपस्थितांनी अक्षता टाकल्या. अशा सुंदर आणि आनंदी वातावरणात हा सोहळा पार पडला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT