palakmantri mangalvedha bhet.jpg 
सोलापूर

मंगळवेढा विकासाला निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

हुकूम मुलानी

मंगळवेढा (सोलापूर) ः स्वर्गीय भारत भालके यांनी मंगळवेढा शहराच्या विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व माझ्याकडे अनेक वेळा मागण्याचे निवेदन दिले आहे.परंतु त्यांनी मागणी केलेल्या सर्व प्रस्तावाला निधी कमी पडू देणार नसल्याची काही पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
 नगरपालिकेच्या वतीने शहरात केलेल्या बगीच्या सुशोभीकरण, गॅस शवदाहिनी, उद्योग प्रशिक्षण इमारत प्रस्तावित अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा, अभ्यासिका,आदीसह  विविध विकास कामाच्या विकास कामाला पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळी साठे नगर येथील कामाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते त्यांच्या समवेत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे लतीफ तांबोळी, नगराध्यक्षा अरुणा माळी,उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,प्रविण खवतोडे,विजय खवतोडे,संकेत खटके,महिला जिल्हाध्यक्षा अनिता नागणे,सोमनाथ माळी,सचिन शिंदे,भागीरथी नागणे,अनिल बोदाडे,चंद्रकांत पडवळे,राहुल सावंजी,बशीर बागवान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजम्मिल काझी, भारत बेदरे,अॅड शिवानंद पाटील, बसवराज पाटील, गुलाब थोरबोले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,नगरपालिकेने विकास कामाच्या संदर्भात जे प्रस्तावाची मागणी केली आहे या मागणीला राज्य सरकार बरोबर जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात आपण निधी उपलब्ध करून देणार आहे यावेळी नगराध्यक्ष अरुणा माळी व पक्ष नेते अजित जगताप यांच्याकडून नगरपालिकेच्या वतीने कोणकोणत्या कामाचे प्रस्ताव दाखल केले आहे त्याची माहिती जाणून घेतली साठे नगर येथे पाहणी दरम्यान एका महिलेने मंजूर होणारी कामे ही त्याच प्रभागात करावी इतरत्र स्थलांतर करू नये अशी मागणी केली. साठे नगर मधील महिला व तरुणांची संवाद साधत सुरु असलेल्या कामाकडे लक्ष देऊन सदरची कामे चांगले करून घेण्यासाठी लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या. कोरोना रुग्ण वाढण्याच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक तालुकानिहाय भेट देऊन असलेल्या अडचणी जाणून घेत असून आवश्यकतेनुसार त्यांना निधी उपलब्ध करून देत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT