3sakal_exclusive_1.jpg 
सोलापूर

चिकन विक्रेत्यांना आता मास्क अन्‌ ग्लोज बंधनकारक ! पीपीई कीट घालून मृत पक्षांची विल्हेवाट लावण्याचे आदेश

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचे संकट आले आहे. मात्र, नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, अंडी व चिकन पूर्णपणे शिजवून खाल्ले तर तो आजार होत नाही, असे आवाहनही करण्यात येत आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी शहरातील चिकन विक्रेत्यांना मास्क व ग्लोज वापरणे बंधनकारक केले आहे. तर मृत पक्षी आढळल्यास पीपीई कीट घालून त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी, असे आवाहनही केले आहे.

आयुक्‍तांच्या आदेशानुसार...

  • होलसेलर व रिटेलअरनी निरोगी कोंबड्या व अंड्यांची करावी विक्री
  • विक्रेत्यांनी मृत पक्षांचे चिकन, मटन विकू नये; कोंबड्यांची पारख करुन करावी खरेदी
  • कुठलाही पक्षी मृत आढळल्यास शास्त्रीय पध्दतीने लावावी विल्हेवाट
  • मृत पक्षाची विल्हेवाट लावताना करावा पीपीई कीटचा वापर; विक्रेत्यांना मास्क व ग्लोज बंधनकारक
  • तीन फुटांचा खड्डा करुन मृत पक्षी पुरताना चुना वापरावा; शहरातील मृत पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत
  • मदतीसाठी कोंडवाडा व कुत्रे निर्बिजीकरणाच्या कर्मचाऱ्यांची घ्यावी मदत; नागरिकांनी कंट्रोल रूमला करावी तक्रार

शहरवासियांनी काही संशय वाटल्यास प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. नितीन गोटे (8459125211) आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ चराटे (9561129393) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, सध्या शहर- जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा एकही रुग्ण नसून नागरिकांनी अंडी व चिकन पूर्णपणे शिजवून खावे, असेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बर्ड फ्ल्यू होणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला आहे. दरम्यान, सध्या कोरोनाचे संकट टळलेले नसून त्यातच आता बर्ड फ्ल्यूचा आजार काही जिल्ह्यांमध्ये आला आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी कोंबड्या, अंडी विक्रेत्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरुन हे संकट आपल्याकडे येणारच नाही, असा त्यामागे हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tawde Hotel Encroachment : कोल्हापुरात महापालिकेचा मोठा दणका! तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज चालणार जेसीबी; कडक आदेश जारी

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात पावसाचं दणक्यात पुनरागमन! घाटमाथ्यावरही धुवाधार; पुढील तीन ते चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज

ढिंग टांग : ऑल इज वेल..!

Pune: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील चार दिवस यलो अलर्ट

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT