02Child_Mask_0 - Copy.jpg 
सोलापूर

मास्क, सोशल डिस्टन्सिंगच कोरोनाविरुध्द लढाईतील फायटर ! शहरातील 23 ठिकाणी 27 रुग्ण 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील मृत्यू आता थांबले आहेत, परंतु दुसरीकडे टेस्टिंगची संख्या वाढलेली नाही. आज 435 संशयितांमध्ये 27 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील दक्षिण कसबा व एमएसईबी कार्यालयाजवळ (मुरारजी पेठ) प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. तर उर्वरित 23 ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान, मास्क, हॅण्डवॉश, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर हेच कोरोनाविरुध्द लढाईतील फायटर आहेत. त्यामुळे त्याचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील एक लाख 21 हजार 670 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • शहरात आजवर आढळले दहा हजार 387 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आज 435 संशयितांमध्ये 27 जंणाचे रिपोर्ट आढळले पॉझिटिव्ह 
  • शहरातील नऊ हजार 395 रुग्णांनी केली कोरोनावर मात; आज 25 जण झाले बरे 
  • सध्या शहरातील 431 रुग्णांवर सुरु आहेत उपचार; 561 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू 

शहरात आज बुधवार पेठ, थोबडे वस्ती (देगाव), निर्मिती विहार (विजयपूर रोड), रामलिंग सोसायटी, बसवेश्‍वर नगर (होटगी रोड), दक्षिण कसबा, बुधले गल्ली (बाळीवेस), यशवंत नगर (सिव्हिल लाईन), टिळक चौक, सुंदरम नगर, व्यंकटेश सोसायटी, आनंद अपार्टमेंट (रेल्वे लाईन), मड्डी वस्ती, सुर्या कॉम्प्लेक्‍स, स्वामी विवेकानंद नगर (सैफूल), डी-मार्टजवळ (पुना रोड), मोदीखाना, काडादी नगर (होटगी रोड), संत तुकाराम नगर (अशोक चौक), एमएसईबी कार्यालयाजवळ (मुरारजी पेठ), अवंती नगर, करंजकर सोसायटी (शेळगी), मुरारजी पेठ, पारशी विहिरीजवळ (नई जिंदगी) आणि रिमांड होमजवळ नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरात सध्या रुग्णांच्या संपर्कातील 108 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 68 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये तर 42 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: कोलकाताने अखेर रोखला हैदबादचा विजयरथ! रघुवंशीचं अर्धशतक, तर रहाणेची भक्कम साथ; KKR चं आव्हान जिवंत

Mother's Day 2026: भारतात यावर्षी 'मदर्स डे' कधी साजरा होणार? जाणून घ्या तारीख, इतिहास आणि या दिवसाचं खास महत्त्व

Latur Crime: जळकोटमध्ये नराधम बापाकडून मंतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; १९ आठवड्यांची गर्भधारणा उघड

Horoscope : उद्या 4 मे! 'या' 4 राशीच्या लोकांचे भाग्य पलटणार; धनप्राप्तीसह मोठं यश, महिलांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉइंट

Amalneer Heatwave Alert: गंगापूर तालुक्यात उष्णतेचा कहर; अमळनेर शाळेतील गुलाब-झेंडू सुकले, तापमान आणखी वाढण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT