malegaon kadha.jpg 
सोलापूर

मालेगाव पॅटर्न काढ्याची वाढत्या मागणीसाठी हैद्राबाद व तमिळनाडूतून मागवले साहित्य 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शहरातील वाढत्या कोरोना संसर्गामूळे पुर्वी वाढलेल्या आयुर्वेदीक काढ्याच्या नंतर आता मालेगाव काढ्यासाठी नागरिक हवे असलेली साहित्याची मागणी करू लागले आहेत. त्यासाठी व्यापारी हैद्राबादमधून मोठ्या प्रमाणात काढ्याचे साहित्य मागवत आहेत. 

जागरूक नागरिकाकडून कोरोना प्रतिबंध करण्यासाठी अनेक प्रकारच्या आयुर्वेदीक साहित्याचा वापर केला जात आहे. तुळशी पावडरची मागणी तर क्विंटलमध्ये गेलेली होती. आयुर्वेदीक काढ्यासाठी या तुळशी पावडरचा वापर केला जातो. या शिवाय काळे मिरे, दालचीनी, सुंठ आदी अनेक वस्तुंची मागणी बाजारात वाढलेली होती. मात्र आता त्यामध्ये मालेगाव काढ्याची भर पडली आहे. 

कोरोना नियंत्रणाचा मालेगाव पॅटर्न राज्यभरात प्रसिध्द झाला. त्यासोबत मालेगाव काढ्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आहे. युनानी पध्दतीने हा काढा केला जातो. त्यासाठी विशेष प्रकारची औषधी घटक वापरले जातात. बाजारात या काढ्याच्या साहित्याची मागणी चांगलीच वाढली आहे. तसेच त्याची माहिती उर्दुमध्ये असल्याने व्यापाऱ्यांची अडचण झाली होती. तेव्हा या व्यापाऱ्यांनी हैद्राबादवरून साहित्य मागवले आहे. 
यामध्ये अडुळसा, लासोडा (कपीस्तान), खुबातजी, खतमी, गोजबान, उन्नाब, ज्येष्ठ मध (मुलठी) आदी घटक वापरले जातात. मात्र महाराष्ट्रात या पैकी बहुतांश वस्तु मिळत नव्हत्या. तेव्हा ज्येष्ठ मध तमिळनाडू मधून मागवण्यात आला. आंध्रप्रदेश व तेलंगणा भागातून उर्वरीत वस्तु मागवण्यात आल्या आहेत. सध्या बाजारात या सर्व वस्तुची हातोहात विक्री होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसात लोकांचा कल आयुर्वेदीक व नंतर युनानी औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तु खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. शहराच्या बाजारपेठेत या वस्तुंची मागणी कीतीतरी पटीने वाढली आहे. गेल्या अनेक वर्षात केवळ जाणकारांकडून अशा वस्तुची मागणी केली जात होती. मात्र आता सर्वसामान्यांकडून देखील खरेदी केली जात आहे. हा मोठा बदल या व्यापाऱ्यांना अनुभवण्यास मिळाला आहे. या व्यापाऱ्यांनी लॉकडाउन सुरु होण्यापुर्वी या वस्तुंची मागणी आंध्र प्रदेश व तमिळनाडुमध्ये करण्यात आली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर त्याची उपलब्धता होणार आहे. 

लाॅकडाउननंतर साहित्य पोहोचणार  
मालेगाव काढ्यासाठी लागणारे साहित्याला उर्दु नावे आहेत.  ग्राहकाकडून या काढ्याचे एकत्रित साहित्य द्यावे अशी मागणी केली जात आहे. हे साहित्य स्थानिक भागात उपलब्ध नाही. त्यामुळे इतर राज्यातून पुरवठा करावा लागणार आहे. शहरातील लॉकडाउन संपताच हे साहित्य उपलब्ध होणार आहे 
- भारत मल्लीनाथ गोटे, आयुर्वेदीक वस्तु विक्रेता 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT