MCP 
सोलापूर

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ टप्प्या-टप्प्याने करणार आंदोलन तीव्र : आडम मास्तर

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : ऐन थंडीच्या मोसमात सुद्धा लाखो शेतकरी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्लीलगतच्या कृषिप्रधान राज्यातील शेतकरी अविश्रांत लढत आहेत. यादरम्यान बळिराजाचा सरकारच्या व्यवस्थेने बळी घेतलेला आहे. या आंदोलनाला "डेथवॉर' अर्थातच मृत्यूची लढाई असे संबोधले आहे. तरीही सरकारला जाग येत नाही, हे दुर्दैव आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने ही विधेयके मागे घ्यावीत; अन्यथा टप्प्या-टप्प्याने हे आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला. 

गेल्या 19 दिवसांपासून देशातील शेतकरी केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेला आहे. तरीही सरकार त्यांची योग्य ती दखल घेत नाही. याच्या निषेधार्थ आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात माकपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 14) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर मौन आंदोलन करण्यात आले. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळपासूनच हातात मागण्यांचे फलक घेऊन श्री. आडम, माकपचे जिल्हाध्यक्ष ऍड. एम. एच. शेख, अनिल वासम यांच्यासह अनेक कार्यकर्ते, शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते. 

या वेळी माध्यमांशी बोलताना माकपचे जिल्हाध्यक्ष ऍड. शेख म्हणाले, ही विधेयके तयार करताना केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी, या देशातील कृषी व्यवस्था आणि शेतकरी यांचा साकल्याने अभ्यास केलेला नाही. त्यामुळे कृषी व्यवस्था पूर्णपणे देशातील मूठभर भांडवलदारांच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे ही विधेयके त्वरित मागे घ्यावीत. या आंदोलनात नक्षलवादी, माओवादी, खलिस्तानी, पाकिस्तानी, चिनी आणि त्यांचे एजंट घुसलेले आहेत. हे आंदोलन चिरडून टाका, अशी चुकीची भूमिका सरकारने घेतलेली आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT