Students_Exam 
सोलापूर

राज्यातील 36 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ! एमपीएससी, मेडिकल, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाला आवर घालण्यासाठी निर्बंध कडक करून राज्यभर दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू झाली आहे. अशा परिस्थितीतही एमपीएससी, मेडिकल आणि दहावी - बारावीच्या तब्बल 36 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये पर्यवेक्षकांना कोव्हिड केअर अथवा पीपीई किट दिले जाणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्‍त पूर्वपरीक्षा आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा रविवारी (ता. 11) घेतली जाणार आहे. एमपीएससीचे चार लाख 23 हजार तर मेडिकलचे पाच हजार 220 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीची परीक्षा 23 तर दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मागच्या आठवड्यात मृत्यू झाला. अनेक विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याने मेडिकल व एमपीएससीच्या बहुतेक विद्यार्थ्यांनीही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. 

तत्पूर्वी, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळातील काहीजणांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केल्यानंतर परीक्षा पुढे ढकलली जाईल की परीक्षेचे स्वरूप बदलेल, याची उत्सुकता होती. मात्र, त्यावर निर्णय घेण्यास काही मंत्र्यांनी हात झटकल्याने परीक्षा नियोजनात काहीच बदल न होता, वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याचा निर्णय झाला, अशी चर्चा आहे. 

परीक्षेला बसणारे विद्यार्थी... 

  • गट - ब संयुक्‍त पूर्वपरीक्षा : 4.23 लाख 
  • परीक्षा केंद्रे : 1500 
  • मेडिकलची प्रवेश परीक्षा : 5220 
  • परीक्षा केंद्रे : 42 
  • दहावी-बारावी : 31.97 लाख 
  • परीक्षा केंद्रे : 29,478 शाळा 

अशी घ्यायला सांगितली काळजी... 

  • परीक्षेसाठी एका वर्गखोलीत असतील 24 विद्यार्थी 
  • विद्यार्थ्यांनी मास्क घालावा; कोरोना अथवा लक्षणे असलेल्यांची स्वतंत्र सोय 
  • पेपर सुरू होण्यापूर्वी एक ते दीड तास अगोदर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी राहावे उपस्थित 
  • सर्वच पर्यवेक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक; लसीकरण करून घेण्याचेही आवाहन 
  • थर्मल स्क्रीनिंग गनद्वारे घेतली जाईल विद्यार्थ्यांच्या तापमानाची नोंद 
  • पर्यवेक्षकांना कोव्हिड केअर किट अथवा पीपीई किट घालून करावी लागेल ड्यूटी 

विद्यार्थ्यांनी स्वत:हून खबरदारी घ्यावी 
दहावी-बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी व परीक्षा कालावधीत काय करावे, कोणते नियम पाळावेत, यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना बोर्डाच्या वेबसाईटवर टाकल्या आहेत. विद्यार्थ्यांनी स्वत:हून खबरदारी घ्यायची आहे. 
- दिनकर पाटील, 
अध्यक्ष, पुणे बोर्ड 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT