corona 
सोलापूर

सोलापुरातील वैद्यकीय सेवेच्या  तक्रारीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती 

प्रमोद बोडके

सोलापूर, ता. 10 : सोलापूर शहरातील कोरोनाबाधित व बिगर कोरोनाबाधित रुग्णांना व्यवस्थित सेवा मिळते की नाही? याबाबत पाहणी करण्यासाठी व वैद्यकीय सेवेच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सहायक संचालक धनराज पांडे यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. 

सोलापूर शहरातील कोविड आणि नॉन कोविड दवाखान्यात रुग्णांना उपचार मिळतात का? पॅथॉलॉजिकल लॅब सुरू आहेत का ? यावर लक्ष ठेवण्याची मुख्य जबाबदारी पांडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नागरिकांच्या समस्या असतील तर त्या त्यांच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहेत. सोलापुरातील वैद्यकीय सेवेबाबत नागरिकांना समस्या असल्याने त्यांनी पांडे (9049802424) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनासंदर्भात तक्रारींचे निरसन होण्यासाठी या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी कार्यक्षेत्रातील डॉक्‍टर, नोंदणीकृत खासगी व शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, पॅथॉलॉजी लॅबबाबत जनतेच्या तक्रारींचे निराकरण करणार असल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली आहे. 

तक्रारीसाठी यांच्याशी साधा संपर्क
तहसीलदार 
उत्तर सोलापूर- जयवंत पाटील (9823722274), दक्षिण सोलापूर- अमोल कुंभार (7249052004), मंद्रूप- श्रीमती उज्ज्वला सोरटे (8329837650), बार्शी- प्रदीप शेलार (9881977866), अक्कलकोट- श्रीमती अंजली मरोड (9921948007), माढा- राजेश चव्हाण (9028861778), करमाळा- समीर माने (9405860348), मोहोळ- जीवन बनसोडे (9764007579), पंढरपूर- श्रीमती वैशाली वाघमारे (9881791009), मंगळवेढा- स्वप्नील रावडे (7385764330), सांगोला- योगेश खरमाटे (9765599599), माळशिरस- अभिजित पाटील (7719955850). 


मुख्याधिकारी 
बार्शी- शिवाजी गवळी (9881380206), पंढरपूर- अनिकेत मानोरकर (8087589051), अक्कलकोट- श्रीमती आशा राऊत (7887893045), सांगोला- कैलास केंद्रे (9579318878), मंगळवेढा- श्रीमती पल्लवी पाटील (8605905400), करमाळा- श्रीमती वीणा पवार (9420696778), कुर्डुवाडी- कैलास गावडे (9822253108), मैंदर्गी- एन.के. पाटील (9922577331), दुधनी- धैर्यशील जाधव (9960229669), मोहोळ- एन. के. पाटील (9922577331), माढा- चरण कोल्हे (9730562586) आणि माळशिरस- विश्वनाथ वडजे (8376049394)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT