Meena Dharmadhikari of Barshi writes religious texts in her own handwriting  
सोलापूर

बार्शीची महिला हस्ताक्षरात लिहितेय धार्मिक ग्रंथ; रोज सहा तास लिखाण

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : विज्ञान युगात २१ व्या शतकात संगणकाने क्रांती केली असून आज पहिलीपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत विद्यार्थी-विद्यार्थीनी, युवक-युवती, विविध शासकीय कार्यालये येथे मोबाईल, टॅब, लॅपटॉप यांचा वापर होताना दिसत असतानाच कागद आणि पेन या गोष्टी दुर्मिळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हस्ताक्षरात कागदावर लिहणे क्वचितच पहायला मिळते. पण बार्शीच्या ज्येष्ठ महिलेने दिवसातील सहा तास रोज खर्च करुन विविध धार्मिक ग्रंथ हस्ताक्षरात लिहून काढून श्रद्धेचा वेगळा ठसा उमटविला आहे.

प्रत्येकाला वेगळा छंद असतो पण फुले प्लॉट येथे राहणाऱ्या मीना धर्माधिकारी (वय ६६) यांनी हा आगळावेगळा हस्तलिखीत धार्मिक ग्रंथ लिहण्याचा छंद जपला असून शेगावचे श्री गजानन महाराज यांचा श्री गजानन विजय हा धार्मिक ग्रंथ २१ अध्याय व १४१ पाने असलेला ग्रंथ रोज सहा तास हस्ताक्षरात लिहून दीड महिन्यात पूर्ण केला असून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

मीना धर्माधिकारी सकाळशी बोलताना म्हणाल्या की, शेगाव येथील भाविकांच्या ग्रुपमध्ये मी होते. त्यातील भक्तांनी मला कोरे कागद पाने असलेला ग्रंथ पाठवला अन् हस्ताक्षरात ग्रंथ लिहून पाठवा असं सांगितले. अन् नियोजन करुन लिखाण सुरु केले. आत्तापर्यंत विष्णू सहस्त्रनाम, श्री सदगुरु यशवंत महाराज जालनापूरकर यांचे चरित्र, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ स्त्रोत्र, श्री.स्वामी चरित्र सारामृत, रेणूका स्त्रोत्र, हरिपाठ, मधूर अष्ठक असे धार्मिक ग्रंथ हस्ताक्षरात पूर्ण केले आहेत. स्वामी समर्थांचा अखंड हरिनाम जप ५o लाख पूर्ण केला असून एक कोटी पूर्ण करणार आहे. महिला दक्षता समिती, विधी सेवा सहाय्य समिती, यशोदा बचत गट, शांतता कमिटी आदि ठिकाणी मीना धर्माधिकारी कार्यरत असून गेली तीस वर्षे झाले लक्ष्मी भजनी मंडळाच्या सदस्य आहेत.
  
मीना धर्माधिकारी म्हणाल्या, हस्ताक्षरात धार्मिक ग्रंथ लिहल्याने मानसिक समाधान मिळते. श्रध्देचे फळ मिळाल्याचा अनुभव आला असून लहानपणापासून लिखाणाची आवड होती. ज्ञानेश्वरी हस्ताक्षरात लिहण्याचा संकल्प केला असून लवकरच सुरवात करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT