Kartik_Wari_nana patole 
सोलापूर

आळंदीच्या कार्तिकी वारीसंदर्भात विधानसभाध्यक्ष पटोले यांच्यासमवेत उद्या पंढरपुरात वारकरी मंडळींची बैठक 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता. 4) येथील संत तुकाराम भवन येथे सकाळी 8.30 वाजता विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकरी महाराज मंडळींची बैठक होणार आहे. 

पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेनंतर वारकऱ्यांना वेध लागते ते आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळयाकडे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी, कार्तिकीसह सर्वच प्रमुख यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. यानंतर आता 8 ते 14 डिसेंबर दरम्यान आळंदी येथे साजऱ्या होणाऱ्या संजीवन समाधी सोहळ्याकडे वारकरी भाविकांचे लक्ष लागले आहे. 13 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीकडे वारकरी भाविकांचे लक्ष लागले आहे. 

पंढरपूरची कार्तिकी यात्रा ज्या पद्धतीने साजरी केली जाते, त्याच पद्धतीने आळंदीची वारी साजरी करावी, अशी मागणी वारकरी महाराज मंडळींनी केली आहे कार्तिकी यात्रेदरम्यान येथील काही वारकरी महाराज मंडळींनी अलीकडेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यानंतर आळंदी वारीसंदर्भात वारकरी महाराज मंडळींशी चर्चा करण्यासाठी श्री. पटोले हे उद्या पंढरपुरात येणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे सदस्य तथा वारकरी - फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिली. 

13 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीकडे वारकरी भाविकांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT