0BIDI_workers 
सोलापूर

कामगारांच्या घरी जाऊन विड्या घ्या अन्‌ पान तंबाखू द्या

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील विविध भागातील महिला विडी कामगार संबंधित कंपनीच्या ब्रँचला जाऊन विड्या देत होत्या व पान-तंबाखू घेऊन घरी जात होत्या. आता ब्रँचमध्ये कामगारांची गर्दी होऊन कोरोना विषाणूचा संसर्ग बळावू शकतो, तेव्हा प्रत्येक विडी कामगाराच्या घरी जाऊन विड्या घ्या व पान-तंबाखू द्या, असा प्रस्ताव पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रशासनाने विडी उद्योजकांसमोर ठेवला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून विडी उद्योग बंद आहे. त्यामुळे या उद्योगावर अवलंबून असलेल्या सुमारे 60 ते 65 हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. लॉकडाउन शिथिलीकरणात विडी उद्योगही सुरू व्हावेत, अशी मागणी विडी उद्योजक व कामगार संघटनांनी प्रशासनाकडे केली होती. यावर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री श्री. भरणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या वेळी उद्योजकांसमोर प्रशासनाने विडी कामगारांच्या घरी जाऊन विड्या गोळा करून पान-तंबाखू देण्याचा प्रस्ताव ठेवला. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह सोलापूर विडी उद्योग संघाचे अध्यक्ष ओम तिवाडी, सचिव सुनील क्षत्रिय, प्रवक्ता बाळासाहेब जगदाळे, विडी कारखानदार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी उद्योजकांनी प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावानुसार यंत्रणा राबविणे अवघड असल्याचे सांगितले. तेव्हा प्रशासनाने त्यांना, दोन-तीन दिवस यावर अभ्यास करून तुमचा प्रस्ताव सादर करा. तेव्हा निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले.

कामगारांचा प्रस्ताव
विडी उद्योजकांनी आपला प्रस्ताव मांडला. यात विडी कामगार त्यांच्या घरीच विडी वळण्याचे काम करतात. तयार विड्या देण्यासाठी व पान-तंबाखू घेण्यासाठी दिवसातून एकदाच ब्रँचला येतात. आता कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याची दक्षता घेत गर्दी होऊ नये म्हणून कामगारांना आपापल्या ब्रँचमध्ये वेळ ठरवून देऊ व त्या वेळेतच त्यांच्या विड्या घेऊ. हे करताना कामगारांची थर्मल स्कॅनिंग करून सॅनिटायझर, साबण, मास्क आदींची सुविधा देऊन सुरक्षित वातावरण ठेवू.

कामगारांच्या प्रस्तावावर प्रशासनाचा प्रस्ताव
* कंटेन्मेंट झोनमध्ये उद्योगाला परवानगी नाही.
* कामगारांची ब्रँचमध्ये गर्दी होऊ नये यासाठी तुम्ही कामगारांच्या घरी जा.
* विड्या घेणाऱ्या व पान-तंबाखू देणाऱ्या कामगारांनी पीपीई किट वापरणे बंधनकारक

प्रस्तावावर उद्योजकांनी मांडल्या अडचणी
प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावावर विडी उद्योजक व माजी आमदार श्री. आडम यांनी अडचणी मांडल्या. ते म्हणाले, 60 ते 65 हजार कामगार शहर व हद्दवाढ भागात विखुरलेले आहेत. प्रत्येक भागात कारखान्यांचे ब्रँच आहेत. त्या-त्या परिसरातील कामगार ब्रँचला येणे सहजशक्य आहे, मात्र कामगारांच्या घरापर्यंत पोचणे खूप कठीण आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने वाहनांची व्यवस्था करावी लागणार. यामुळे प्रत्येक गल्लीबोळात कामगारांची गर्दी होईल. अशी यंत्रणा राबविण्यासाठी तेवढे कामगार उपलब्ध नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

SCROLL FOR NEXT