rajan-patil 
सोलापूर

अनगरसह परिसरातील ग्रामपंचायती बिनविरोधची परंपरा कायम ! 

भीमाशंकर राशीनकर

अनगर (सोलापूर) : अनगर ग्रामपंचायत स्थापनेपासूनची 68 वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखत अनगरसह परिसरातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, लोकनेते (स्व.) बाबूरावअण्णा पाटील- अनगरकर यांनी घालून दिलेल्या आदर्शांची जपणूक अनगरकरांनी करत पाटील परिवारावरील प्रेम आजही तिसऱ्या पिढीपर्यंत अबाधित राखले आहे. 

एरव्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटलं की पार्टी, गटबाजी, भांडण, मारामारी, चुरस, वैमनस्य, घराघरांत गट-तट या गोष्टी आल्या. पण या सगळ्या गोष्टींना अपवाद आहे तो म्हणजे मोहोळ तालुक्‍याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनगर व अनगर परिसरातत्या वाड्या. अनगर पंचक्रोशीला (स्व.) बाबूरावअण्णा पाटील- अनगरकर यांनी घालून दिलेला विचारांचा वारसा मोहोळचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील यांनी यशस्वीरीत्या सांभाळलेला आहे. 1952 साली स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीला बिनविरोध करण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे. अनगर, बिटले, खंडोबाचीवाडी, कुरणवाडी (अ.), पासलेवाडी, नालबंदवाडी, गलंदवाडी, काळेवाडी या गावच्या ग्रामपंचायतीही बिनविरोध झाल्या आहेत. 

या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील व युवा नेते अजिंक्‍यराणा पाटील यांनी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी गावा- गावांत बैठका घेऊन सर्वमान्य उमेदवारांना संधी दिली आहे. आमदार यशवंत माने यांनी ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात यासाठी 9 ते 17 सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींना 31 लाखांचे तर त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींना 21 लाखांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले आहे. सर्व गावातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. 

अनगर व परिसरातील सर्व ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणुकांची परंपरा हा माझे वडील लोकनेते (स्व.) बाबूरावअण्णा पाटील यांनी घालून दिलेला विचार आहे. तो आजही अनगरसह परिसरातील नागरिकांतून मनोभावे जपला जातो आहे. या बिनविरोध ग्रामपंचायतींचे श्रेय आपण पाटील परिवारावर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या सुजाण नागरिकांना देतो. लोकांचे प्रेम हीच पाटील परिवाराची संपत्ती आहे. आम्ही त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतो. 
- राजन पाटील, 
माजी आमदार 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Bhau Flex Kadha Campaign : महायुती सरकारला ‘महाराष्ट्र विद्रूपीकरण पुरस्कार’ द्या; काँग्रेसने महायुती सरकारला केले लक्ष्य

Latest Marathi News Live Update: एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्ट्सचे मुंबई हायकोर्टात आव्हान

Maharashtra Digital Governance 174 Systems : सरकारी कार्यालयांमधील चकरा थांबणार! मुख्यमंत्र्यांकडून १७४ डिजिटल प्रणालींचे लोकार्पण; प्रजासत्ताक दिनापासून राज्यात 'झिरो ब्युरोक्रसी' आणि पेपरलेस प्रशासन!

AgriStack Farmer ID Maharashtra : महाराष्ट्राची देशात मोठी भरारी! १.४४ कोटी शेतकऱ्यांची 'अ‍ॅग्रीस्टॅक' नोंदणी पूर्ण; उर्वरित शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कसा काढावा? कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

SCROLL FOR NEXT