Aawas Yojana 
सोलापूर

जिओ टॅगिंगद्वारे मिळणार "प्रधानमंत्री आवास'च्या मंगळवेढ्यातील सदस्यांना लाभ !

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : शासनाच्या महाआवास अभियानाअंतर्गत तालुक्‍यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील तीन हजार 500 लाभार्थींना घरकुल योजनेच्या लाभासाठी जिओ टॅगिंग करून त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती प्रेरणा मासाळ यांनी दिली. 

तालुक्‍याला घरकुलासाठी आतापर्यंत मिळालेल्या उद्दिष्टामधील सर्वांत मोठे उद्दिष्ट यंदा मिळाले आहे. 2011 च्या आर्थिक, सामाजिक व जातनिहाय सर्वेक्षणाच्या आधारावर तालुक्‍यातील प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभासाठी 6 हजार 922 लाभार्थी निश्‍चित करण्यात आले. आतापर्यंत त्यामधील 3 हजार 250 लाभार्थींना लाभ दिला आहे. उर्वरित सर्वच लाभार्थींना निवारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांची करारनाम्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती येथे तत्काळ जमा करावीत. जिओ टॅगिंग करून त्यांना या योजनेचा तत्काळ लाभ देण्यात येणार आहे. याशिवाय रमाई आवास घरकुल योजनेचे तालुक्‍यासाठी 2020-21 साठी 220 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यासाठी असलेल्या लाभार्थींनी विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायतीच्या मार्फत पंचायत समिती येथे जमा करण्याचे आवाहन सभापती मासाळ यांनी केले आहे. 

लाभार्थींनी पहिला हप्ता जमा होताच घराचे बांधकाम सुरू करून घ्यावे. या लाभार्थींना याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देखील 18 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. घरकुल लाभार्थींना यापूर्वी शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे पाच ब्रास वाळूसाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक बबनराव खाडे, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी दिलेल्या संधीमुळे व जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर यांच्या सहकार्याने नवनवीन विकासकामे करण्यावर आपला भर राहील, असेही सभापती मासाळ यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

आतापर्यंत पंचायत समिती प्रशासनाने घरकुलाचे काम चांगल्या पद्धतीने केल्यामुळे तालुक्‍याचा पुणे विभागामध्ये नावलौकिक राहिला. तो नावलौकिक पुढे कायम ठेवण्याच्या दृष्टीने व प्रस्तावित उज्ज्वला गॅस, वीज जोडणी, नळ कनेक्‍शनचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यत पोचण्यासाठी प्रयत्नशील आहे. 
- प्रेरणा मासाळ, 
सभापती, पंचायत समिती 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT