सोलापूर

बाबासाहेबांच्या आठवणी आज झाल्या ताज्या...

महासिद्ध साळवे

कुसूर (जि. सोलापूर) : मंद्रूप येथे विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाच्या दौऱ्याचा कार्यक्रम व निवडणूक प्रचारासाठी 24 जानेवारी 1937ला सोलापूर जिल्ह्यात आले होते. त्या घटनेला आज (ता. 24) 83 वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक भेटीची जपणूक म्हणून मंद्रूपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून होत आहे. 
या दिवशीच्या दौऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, कुर्डुवाडी, टेंभुर्णी व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मंद्रूप व वळसंग या गावांना भेट देऊन तत्कालीन लोकसभेचे उमेदवार जीवाप्पा ऐदाळे यांना मते देण्यासाठी आवाहन केले होते. सोलापूरचा कार्यक्रम संपून बाबासाहेब मंद्रूप येथे येणार म्हणून मंद्रूप परगणा व मंगळवेढा संस्थानातून जमलेला दोन हजारांवर लोकांचा जनसमुदाय वाद्यवाजंत्र्यासह आतुरतेने गावाबाहेर उभा होता. 
दहाच्या सुमारास बाबासाहेबांची मोटार येऊन थांबली व आंबेडकर जिंदाबादची घोषणा झाली. बाबासाहेब मिरवणुकीने मंडपाजवळ येताक्षणी सुवासिनी महिलांनी त्यांच्या चरणाजवळ पाण्याच्या घागरी ओतल्या, कापूर लावून नारळ फोडले व पंचारती घेऊन "इडा पीडा जावो, बाबासाहेब यशस्वी होवो' म्हणून ओवाळणी केल्यानंतर सभेच्या कामाला सुरवात झाली. प्रथम मंद्रूप परगण्याचे देशम्हेत्रे, गंगाप्पा रणखांबे यांनी स्वागत केले. जीवाप्पा ऐदाळे यांना मते देण्यास सांगितले. नंतर भीमाप्पा रणखांबे यांनी श्रीमंत देशमुख, श्री. पांढरे आणि सभाजन यांचे आभार मानले व बाबासाहेबांच्या जयजयकारात सभा संपविण्यात झाली. तदनंतर बाबासाहेब सोलापूरकडे परतले. तेथे धाकटा महारवाडा, आंबेडकर तालमीची पानसुपारी उभ्याने स्वीकारून लागलेच ते वळसंगकडे रवाना झाले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंद्रूप येथील सभेची ही माहिती संकलित करून चंद्रशेखर गायगवळी यांनी बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक भेटीचे महत्त्व जाणून 26 जानेवारी 2019 ला मंद्रूप ग्रामपंचायतला बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा आरक्षित करावे व मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयास बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी निवेदन दिले होते. मात्र, अद्याप या ऐतिहासिक भेटीची ग्रामपंचायतकडून दखल घेतली जात नाही. याची दखल घेत स्मारकासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT