102Child_Mask_0_20_20Copy_3.jpg 
सोलापूर

कोरोना बाधितांमध्ये पुरुषच अव्वल ! शहरात आज 31 पुरुष अन्‌ 18 महिला पॉझिटिव्ह; तीन महिलांचा मृत्यू

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोना बाधितांची संख्येबरोबरच मृतांची संख्याही वाढू लागली आहे. मृतांमध्ये को-मॉर्बिड रुग्णांचा सर्वाधिक समावेश असून आज अवंती नगर परिसरातील 75 वर्षीय महिला, आदित्य नगर (विजयपूर रोड) येथील 71 वर्षीय महिलेचा तर जोडभावी पेठेतील 83 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 715 संशयितांमध्ये 31 पुरुष तर 18 महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आणि मृतांमध्ये पुरुषांचीच संख्या महिलांच्या तुलनेत सर्वाधिक राहिली आहे.

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील एक लाख 82 हजार 135 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • शहरात आतापर्यंत सात हजार 592 पुरुषांना तर पाच हजार 163 महिलांना कोरोनाची बाधा 
  • एकूण रुग्णांपैकी 449 पुरुषांचा आणि 220 महिलांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
  • 12 हजार 755 रुग्णांपैकी 11 हजार 624 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • कॉलनी, अपार्टमेंट, कॉम्प्लेक्‍समध्ये वाढू लागला कोरोनाचा प्रादुर्भाव; नियमांचे पालन करण्याचे महापालिकेचे आवाहन 

शहरात आज पश्‍चिम मंगळवार पेठ, भवानी पेठ, अवंती नगर (पुना नाका), इंदिरा नगर, रामलिंग नगर, द्वारका नगर (विजयपूर रोड), ओम नम:शिवाय नगर (हत्तुरे वस्ती), शाहीर वस्ती (भवानी पेठ), विष्णुपुरी, साई समर्थ अपार्टमेंट, निर्मिती विहार (जुळे सोलापूर), दक्षिण कसबा, मोहिते नगर (होटगी रोड), लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स, सोना नगर, बलिदान चौक (भवानी पेठ), यशोधन अपार्टमेंट, प्रगती नगर, कुमारस्वामी नगर (शेळगी), दाजी पेठ, वसुंधरा अपार्टमेंट (देगाव रोड), दमाणी नगर, इंद्रधनू, कलावती नगर, स्वागत नगर, राजीव नगर, जगजीवन राम झोपडपट्टी, आशा नगर, गांधी नगर (अक्‍कलकोट रोड), गीता नगर, नम्रता हौसिंग सोसायटी, राजस्व नगर, भारतमाता नगर, पेन्नूर नगर, आसरा कॉलनी, उत्तर कसबा, दमाणी नगर आणि मंगळवार पेठ याठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT