panthal diwas.jpg 
सोलापूर

पाणथळ निसर्गठेवा जपण्याचा पर्यावरणप्रेमींनी दिला संदेश 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : येथील वनविभाग, सामाजिक वनीकरण, डॉ. मेतन फाउंडेशन व रानवेध निसर्ग मंडळ यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या जागतिक पाणथळदिनानिमित्त हिप्परगा तलाव परिसरात पाणथळ जागेस भेट, तलावाच्या परिसरात पक्षी निरीक्षण, सायकल रॅली, वृक्षारोपण व परिसंवाद असे कार्यक्रम पाडले. 
सोलापूर सायकल क्‍लबच्या सदस्यांनी सकाळी साडेपाच वाजता सात रस्ता येथून हिप्परगा तलाव येथे सायकल रॅली काढली. सकाळी ठीक सव्वासहा वाजता हिप्परगा तलाव येथील शासकीय विश्रामगृह येथून पाच गटातून हिप्परगा तलावाच्या बांधावरून चालत हिप्परगा तलावाच्या आजूबाजूला असलेले पाणथळ, वाटेत पक्षी निरीक्षण करीत पंप हाऊसला भेट दिली. प्रल्हाद कांबळे यांनी या पंप हाउसची माहिती सर्वांना सांगितली. त्यानंतर हिप्परगा तलाव विश्रामगृह येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला. या बैठकीत श्री. हाके यांनी कॉन्झर्वेशन रिझर्व व पाणथळ या विषयावर मार्गदर्शन करताना पाणथळ याचे महत्त्व मानवी जीवनातील महत्त्व सांगितले. सोलापूर येथील पाणथळीच्या संरक्षणासाठी काही प्रकल्प सुचविले. यावेळी उपस्थित असलेल्या देवांश आणि पार्थ क्षीरसागर या चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. श्री विनोद कामतकर यांनी आभार प्रदर्शन केले. 
हा उपक्रम रोटरी क्‍लब ऑफ सोलापूर ईस्ट, इनरव्हील क्‍लब ऑफ सोलापूर हार्मनी, सोलापूर सायकल क्‍लब, युगंधर ग्रीन आर्मी व इको फ्रेंडली क्‍लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. या उपक्रमास उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, सौ ज्योती भंडारी, सुनील अग्रवाल, भाऊराव भोसले, कु. रश्‍मी माने, संजय भोईटे, बाळासाहेब लांबतुरे, सोमेश्वर लवंगे, सिद्धाराम सक्करगी, चिदानंद मुस्तारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

तर हिप्परगा तलाव पक्षीधाम होईल 
हिप्परगा तलाव परिसरातील वन्यजीवन विशेषतः पक्षांबद्दल उत्तम माहिती दिली. हिप्परगा येथील तलाव व पाणथळ येथे काही प्रकल्प राबविल्यास हिप्परगा तलाव राष्ट्रीय पातळीवर उत्तम पक्षीधाम होईल, असे मत डॉ. व्यंकटेश मेतन यांनी व्यक्त केले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT