Messages about corona and culture go viral on social media 
सोलापूर

स्नान केल्याशिवाय कोणाला शिवायचीही म्हणून परवानगी नसायची

अशोक मुरुमकर

सोलापूर : चार- पाच महिन्यांत कोरोना व्हायरसने संपूर्ण जग कवेत घेतलंय. त्याला रोखण्यासाठी देशात प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्याचा संसर्ग कमी झालेला नाही. महाराष्ट्रात सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू आहे. या व्हायरसचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नागरिकांना वेळोवेळी काळजी घेण्याबाबत सूचना देत आहेत. याचबरोबर सरकार काय करत आहे, याचीसुद्धा ते माहिती देत आहेत. नागरिक सूचनांची अंमलबाजवणी करत आहेत. याबाबत जागृती करण्यासाठी व मदतीसाठी अनेकजण पुढे आले आहेत. अशातच सोशल मीडियावर दररोज अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. त्यातील एका मेसेजने अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये जुन्या परंपरा आणि आताच्या सूचना यांच्याशी सांगड घातली आहे. याबाबत अनेकांची वेगवेगळी मते आहेत. पण काहींनी तो मेसेज वास्तवाजवळ नेत असल्याची भावना व्यक्त केली आहे. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये म्हटलंय की, अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर अंघोळीशिवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची? चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का केला जातो? तर संक्रमण पसरणे (Infections spread) टाळण्यासाठी. घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची? (यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?) कारण मृत्यूसमयी माणसाला काही ना काही आजार असतोच. त्याची प्रतिकारशक्ती कमी (Immunity lowest level) असते. त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते. या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.
काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे. त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे. इथे कारण उलटे असते, कारण नवजात बालकाची रोगप्रतिकारशक्ती (immunity) खूप कमी असते. बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे, जसे आपण आता करत आहोत. मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?
आलं का logic लक्षात, असंही यामध्ये म्हटलं आहे. शौचास बसून करण्याची भारतीय पद्धत का प्रचलित आहे? आतड्यांना लॉक करणारे मसल्स अनलॉक झाल्याने मलाचा पूर्ण निचरा होतो, टॉयलेट पेपरची गरज नाही. त्यामुळे इको-फ्रेंडली आहे. पाश्चात्य कमोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो तसा भारतीय पद्धतीत होत नाही. हळद आणि मसालेयुक्त अन्न शरीराच्या प्रतिकारशक्तीला आपसूकच बळ देतात. लग्नाआधी हळदी समारंभ का असतो?
आता western लोकही हळद- दूध प्यायला लागलेत! फरक एवढाच की ते त्याला turmeric latte म्हणतात. तुमच्या शहरातील कोणत्याही cafe shop वर जाऊन turmeric latte मागवून तर बघा. घरात कापूर जाळणे, धूप फिरवणे यामागे काय कारण असावे? Logic लक्षात घ्या. ऋतुमानानुसार सणवार आणि अन्न नियोजन यामागे किती मोठा विचार असेल....? उन्हाळा सुरू व्हायच्या आधीचा काळ हा व्हायरल इन्फेक्शनचा असतो. या काळातच दारोदारी होळी का पेटवली जाते...? जगातला सगळ्यात जास्त शाकाहारी असलेला देश भारतच आहे. असे का...? इथे भारतात आपण प्राण्यांत पण देव पाहतो. झाडांमध्ये, दगडांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्येही...
आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभवसंपन्न झाली आहे. आमचीच संस्कृती किती वैज्ञानिक आहे, याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमन सेन्सचा भाग आहे. स्वतःच्या संस्कृतीला कमी समजणे आणि वेस्टर्न तेच योग्य ही विचारसरणी कोरोनापेक्षा घातक आहे. यावर नक्कीच विचार व्हावा व पालन व्हावे, असं म्हणून घरातच राहा सुरक्षित राहा, असा सल्ला यामध्ये देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT