12Milk_0 
सोलापूर

कोरोना संचारबंदीने दुध व्यवसायाला लाखोचा फटका

सकाळ वृत्तसेवा

कुर्डू (सोलापूर) ः कोरोना व्हायरस धास्तीने देशात "लॉकडाऊन' असून शहर व गावे ओस पडल्याने अत्यावश्‍यक दूध व्यवसायावर याचा परिणाम झालेला दिसत आहे. जिल्ह्यात दूध व्यवसायात आघाडीवर असलेले कुर्डू (ता. माढा) येथील दूध उत्पादकांचे 20 ते 25 हजार लिटर दुधाचे सात ते आठ लाखांचे नुकसान होत आहे. 
कुर्डू हे दूध व्यवसायाचे मोठे केंद्र आहे. मधुर दूध, सोनाई दूध, अमृत मिल्क, शिवकृपा दूध यांच्याकडून दररोज 60हजार लिटर दुधाचे संकलन होते. दूध संघाचे चिलिंग सेंटर व बल्क कुलर आहेत. कोरोना व्हायरसमुळे शहरातून दुधाची मागणी अत्यंत कमी असल्याने दररोज संकलित दुधाचे करायचे काय? असा प्रश्‍न दूध उत्पादकांसमोर नव्याने निर्माण झाला आहे. 
सध्या चिलिंग सेंटर येथील दुधाच्या टाक्‍या भरलेल्या असल्याने दूध संकलन कोठे करावे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे दूध संकलन बंद करण्याची वेळ संस्था चालकांवर आली आहे. दररोज दूध घालणाऱ्या संस्था उत्पादकांचे दूध कोणही घेण्यास तयार नाही. सरासरी 30 रुपये प्रती लिटरने 25 हजार लिटरच्या सात लाख 50 हजारांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

  • कोरोनामुळे दुधाची मागणी झाली कमी 
  • पुणे व मुंबईला दुध पाठवणे बंद 
  • दररोज सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान 
  • दुध संस्था आल्या अडचणीत 

दुधाचे टॅंकर नाही तर करणार काय
दूध पुरवठा करत असलेल्या संस्थांनी आम्हाला दुधाचा कोठा ठरवून दिल्याने त्याच्यापेक्षा जास्त दुधाचे टॅंकर आमच्याकडून स्वीकारत नाहीत. आम्हाला दूध पुरवठा करत असलेल्या संस्था व उत्पादकांना ते संकलित करत असलेले दूध एक-दोन दिवस बंद ठेवावे लागत आहे. 
-रामलिंग गाडे, अध्यक्ष, मधुर मिल्क मिल्क प्रॉडक्‍ट्‌स, कुर्डू, ता. माढा 

चीलींग सेंटरवर दुधाच्या टाक्या भरल्याने अडचण
आम्ही संकलित केलेल्या दुधाचे टॅंकर पाठवण्यात आलेल्या संघांत रिकामे होत नाहीत. चिलिंग सेंटरवरील दुधाच्या टाक्‍या भरलेल्या आहेत. त्यामुळे संकलन कोठे करावे असा प्रश्‍न आहे. त्यामुळे दररोज संकलित होणारे 15 हजार लिटर दुधाचे संकलन थांबवावे लागले आहे. 
-बापूसाहेब जगताप, अमृत मिल्क प्रॉडक्‍ट्‌स, कुर्डू, ता. माढा 

मुंबई व पुण्यात दुध वाहतूक हवी
कोरोनामुळे सध्या दुधाची मागणी कमी झाल्याने दूध व्यवसायावर मोठे संकट आले आहे. सरकारने कोरोनाची योग्य काळजी घेऊन मुंबई, पुणे येथे नियमित दूध चालू केल्यास राज्यातील दूध व्यवसायावर ही वेळ येणार नाही. 
-डॉ. नामदेव कापरे, अध्यक्ष, शिवकृपा मिल्क अँड प्रॉडक्‍ट्‌स, कुर्डू, ता. माढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT