सोलापूर

गीर अन्‌ खिलारच्या संकरातून वाढीव दूध उत्पादन

अजित ओक यांचा प्रयोग; गोशेतीतून वाढवला सेंद्रिय कर्ब

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : नोकरी सोडून गोशेती आपली पॅशन बनवणाऱ्या अजित ओक यांनी स्वतःची गोशाळा उभी केली. शेतीमधील सेंद्रीय कर्ब वाढवत नेऊन शेतीचा कायापालट घडवून आणला आहे. अजित ओक हे रेल्वेत नोकरीत असताना त्यांना रक्तदाब व मधुमेह यासारख्या जीवनशैलीच्या आजाराचा त्रास सुरू झाला. तेव्हा त्यांनी कोणत्याही स्थितीत आरामदायी नोकरी सोडून शेती करण्याचे ठरवले. निवृत्त होण्याच्या आधी त्यांनी शेती विकत घेतली. शेती करण्याचे कौशल्य शिकेपर्यंत त्यांनी नोकरीदेखील चालूच ठेवली. नंतर पूर्णवेळ ते गोशेतीत काम करू लागले. घरात आजोबापासून घरचं दूधदूभत वापरण्याची सवय होती.

सुरवातीला त्यांनी दोन गाई विकत घेतल्या. नंतर या गाईंची संख्या वाढत नेली. त्यांच्याकडे खिलार, गीर या दोन्ही प्रकारच्या गाई आहेत. त्यांनी खिलार व गीर गाईचा संकर घडवून आणला. तेव्हा त्यांना आता ही संकरीत गाय दहा लिटर प्रतिदिन दूध देणारी उपलब्ध झाली आहे. आता या गाईच्या कालवडीच्या दुधाचा वेत तपासला जाणार आहे. या गाई ते मुक्त व बंदिस्त गोठा पध्दतीने सांभाळतात.

त्यांनी गोशेतीसोबत मोठ्या प्रमाणात सर्व पिकांचे राहिलेले अवशेष, पालापाचोळा, उसाचे वाढे आदीची कुट्टी करुन ते शेतात कुजवण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे त्यांच्या जमिनीचा शेणखत, गोमुत्र व चाऱ्यामुळे सेंद्रीय कर्ब ०.७ पर्यंत वाढवत आणला आहे. त्याचा परिणाम त्यांच्या पिकांवर दिसू लागला आहे. डाळिंबाची लागवड केल्यानंतर त्यांच्या डाळिंबाची चव व गुणवत्ता अप्रतिम असल्याने ग्राहकांच्या ती पसंतीस पडली.

त्यानंतर त्याची दुग्ध उत्पादनामध्ये श्रीखंड हे त्यांच्या गोशेतीची ओळखच बनली आहे. अजित ओकांची शेतीची जीवनशैली बदलल्याने त्यांचा रक्तदाब व मधुमेहाचा त्रास कमी होऊन गेला. तसेच शेतीच्या सुपिकतेने ही शेती सर्वाधिक सुपिकतेच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.

सेंद्रिय उत्पादनांचा स्वतंत्र बाजार हवा

अजित ओक यांनी सेंद्रिय पध्दतीने डाळिंब पिकवले पण त्या सेंद्रिय उत्पादनांचा स्वतंत्र बाजार नसल्याने अडचण झाली. पण ग्राहकांनी खरेदी केल्यानंतर हे डाळिंब चव व गुणवत्तेवरून सेंद्रिय असल्याचे ओळखले. पण स्वतंत्र बाजार नसल्याने त्यांच्या उत्पादनां न्याय मिळवणे अवघड झाले अशी ते खंत व्यक्त करतात.

ठळक बाबी

  • शेतात सलग दहा वर्षे गाईचे शेणखत व पालापाचोळ्याचा वापर

  • शेतीच्या सेंद्रिय कर्बात (ऑरगॅनिक कार्बन) ०.७ टक्केपर्यंत वाढ

  • एकूण १० गाईचा सांभाळ

  • खिलार व गीरच्या संकरीत वाणाचा प्रयोग यशस्वी

  • संकर केलेल्या गाईच्या दूधाचा रोज १० लिटर दुधाचा वेत

  • शेतीच्या जीवनशैलीने रक्तदाब व मधुमेहाचा त्रास झाला कमी

  • गाईच्या दुधाचे श्रीखंड अन्‌ सेंद्रिय पध्दतीने पिकवलेली डाळिंबे हे इमर्जींग ब्रॅंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT