Solapur News Sakal
सोलापूर

Solapur News : अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच उभारा; आमदार देशमुख-शिंदे विधानसभेत आक्रमक

बारामतीला जास्तीचा निधी द्या, पण मिलेट सेंटर सोलापूरमध्येच उभारावे

सकाळ वृत्तसेवा

Solapur News: येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला नेण्याचा शासकीय निर्णय झाल्यानंतर राजीनामा देण्याचा इशारा देणारे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी त्यासंबंधीचा मुद्दा आज (मंगळवारी) विधानसभेत उपस्थित केला.

बारामतीला जास्तीचा निधी द्या, पण मिलेट सेंटर सोलापूरमध्येच उभारावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. त्यांना विरोधी पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही साथ दिली.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील अर्थसंकल्पात सोलापूरला श्री अन्न उत्कृष्टता केंद्र (मिलेट सेंटर) जाहीर केले. पण, काही दिवसांपूर्वी शासकीय परिपत्रक निघाले आणि हे केंद्र सोलापूरहून बारामती येथे हलविण्याचा निर्णय झाला.

बारामतीला मिलेट सेंटर सुरू करण्याबाबत आमचा विरोध नाही पण, सोलापूरचे पळवून बारामतीला नेण्यामागील लॉजिक आम्हाला कळलेले नाही. सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र अधिक असल्यानेच अर्थसंकल्पात ते केंद्र सोलापूरमध्ये स्थापन करण्याचा निर्णय झाला होता.

मात्र, अर्थसंकल्पातील निर्णय बदलण्याची चुकीची प्रथा पडत असल्याचे या निर्णयातून दिसून येत आहे. या मिलेट सेंटरमध्ये दोनशे कोटींची गुंतवणूक होणार होती आणि त्यातून हजारो युवकांना रोजगार मिळणार आहे.

त्यामुळे सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र दुसरीकडे कुठेही न हलवता सोलापूरमध्येच करावे, अशी माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, असे प्रणिती शिंदे यांनी नमूद केले. दोन्ही आमदारांच्या मागणीवर आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सोलापुरातील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला स्थापन करण्याचे परिपत्रक निघाले. त्यानंतर केंद्र जाणार नसून केवळ प्रशिक्षण केंद्र बारामतीला जाणार असल्याचे काहींनी सांगितले. पण, परिपत्रकात केवळ प्रशिक्षण केंद्र तिकडे जाणार असल्याचा उल्लेख नाही.

ते केंद्र सोलापूरऐवजी बारामतीला स्थापन करावे, असे परिपत्रकात स्पष्टपणे नमूद आहे. अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री असून ते बारामती विधानसभेचे सदस्य जरूर आहेत. त्यांना मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, योजना द्याव्यात, पण सोलापूरचे केंद्र सोलापूरमध्ये व्हायला पाहिजे, अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी केली.

प्रणिती शिंदेंनी १२.४६ मिनिटांत मांडले ११ प्रश्न

नागपूर अधिवेशनात मंगळवारी (ता. १२) आमदार प्रणिती शिंदे यांनी १२.४६ मिनिटांत सोलापूर शहरातील बांधकाम, विडी, वस्त्रोद्योग कामगारांसह रिक्षाचालक आणि चिंचोली व अक्कलकोट रोड एमआयडीसीतील उद्योजकांचेही प्रश्न मांडले.

तसेच यंत्रमाग कामगार कल्याण महामंडळ, रिक्षा कामगारांसाठी महामंडळ, विडी कामगार महिलांना शिलाई मशिन, कामगारांसाठी माध्यान्ह भोजन, आरोग्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, एकरूख सिंचन योजनेतून अक्कलकोट तालुक्यातील ५१ तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ गावांना पाणी मिळावे,

भटक्या विमुक्तांसाठी घरकूल योजना असावी, आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठी वस्त्रनिर्माण कोर्स सुरू करावा, एमआयडीसीमधील उद्योजकांना पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध करून द्यावी, एमआयडीसीमधील रस्ते, ड्रेनेजची सोय करावी, हॅण्डलूम- पॉवरलूम उद्योजकांसाठी विशेष मदत करावी, अशा मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT