ना पावसाळा, ना हिवाळा... हा तर हिवसाळा! 'सोशल'वर व्हायरल मिम्स esakal
सोलापूर

ना पावसाळा, ना हिवाळा... हा तर हिवसाळा! 'सोशल'वर व्हायरल मिम्स

ना पावसाळा, ना हिवाळा... हा तर हिवसाळा! 'सोशल'वर व्हायरल मिम्स

विजयकुमार कन्हेरे

ऐन हिवाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना नेमका कोणता ऋतू सुरू, आहे हेच समजेनासे झाले आहे.

कुर्डुवाडी (सोलापूर) : ऐन हिवाळ्यात (Winter) पडणाऱ्या पावसामुळे (Rains) नागरिकांना नेमका कोणता ऋतू सुरू, आहे हेच समजेनासे झाले आहे. 'पावसाळा नाही आणि हिवाळा पण नाही.. हा तर हिवसाळा...' या प्रकारचे मिम्स सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत. अवेळी पडत असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. पावसामुळे (Rainy Season) नागरिक कामाव्यतिरिक्त बाहेर पडत नाहीत. छोटे व्यावसायिक ग्राहकांची वाट पाहात असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य नागरिक या अवेळीच्या पावसाला कंटाळले आहेत. दिवाळीत व नंतर साधारणपणे थंडी असते, पण यंदा दिवाळीत रात्री अनेक वेळा फॅन लावावा लागला. सध्या तर केव्हा पाऊस पडेल हे सांगता येत नाही. केव्हाही पाऊस पडू शकतो या मानसिकतेतून नागरिक त्या तयारीनीशी घराबाहेर पडत आहेत. दिवसा किंवा संध्याकाळी पाऊस पडत असल्याने बाहेर जाणाऱ्यांना छत्री किंवा रेनकोट घेऊन जावे लागत आहे.

रात्रीच्या वेळी उकाड्याने फॅन लावावा लागतो, तर पहाटे मॉर्निंग वॉक किंवा कामानिमित्त जाणाऱ्यांना स्वेटर घालावा लागत आहे. याबद्दलचे अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'जूनमध्ये शाळा सुरू झाल्याचा मुलांना फील यावा म्हणून आता डिसेंबरमध्ये पाऊस पडतोय..!', 'सूर्य सुट्टीवर गेल्याने वरुणराजाने हजेरी लावली..!', 'आता फक्त रात्री ऊन पडायचे बाकी राहिलंय..!', 'स्वेटर घालावा की रेनकोट घालावा..? स्वेटरवर रेनकोट घाला..!' अशा प्रकारचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT